नागपूर (Nagpur). नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation’s) आरोग्य विभागाने (The health department) कोरोनाचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उभारलेल्या लढ्याचे कौतुक करण्यासारखे आहे. कारण रविवारी प्राप्त कोरोना अहवालानुसार शहरातील कोरोना रुग्णांची संख्या फक्त 2 आढळली. याचा अर्थ शहरातून कोरोना हद्दपार झाला, असे नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
[read_also content=”शिक्षकमित्राची क्रुरता/ चिमुकलीला २०० उठाबशा आणि छड्यांचा बेदम मार; मुलीची अवस्था नाजूक https://www.navarashtra.com/latest-news/the-cruelty-of-a-teacher-friend-girl-was-beaten-with-200-sticks-and-sticks-the-girl-condition-is-critical-nrat-160807.html”]
कोरोनामुळे शहरात रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. याआधी कोरोना पॉझिटिव्ह असलेले 08 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या नागपुर शहरात 176 कोरोना अॅक्टिव्ह केसेस आढळून आले आहेत.
[read_also content=”नुकसानग्रस्त भागाची पाहणी/ अन् नवनीत राणा यांना रडू कोसळलं; पावसामुळे घरांची पडझड, नागरिकांवर उपासमारीची वेळ https://www.navarashtra.com/latest-news/navneet-rana-burst-into-tears-houses-collapse-due-to-rains-time-of-famine-on-citizens-nrat-160796.html”]
कोरोना केंद्रावर आज 6169 कोरोना संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. नागपूर मनपातर्फे नागरिकांना आज देण्यात आलेल्या लसिकरणाच्या पहिल्या डोजची संख्या 8 लाख 80 हजार 121 इतकी आहे. याशिवाय 3 लाख 56 हजार 111 नागरिकांना लसीचा दुसरा डोज देण्यात आला.