नंदीग्राम एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या (फोटो सौजन्य- india rail)
दादर रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादर रेल्वे स्थानकातील नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एका व्यक्तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्तिने मफलरच्या साह्याने गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. मृत व्यक्ति घाटकोपर परिसरातील रहिवासी असून त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच दादर रेल्वे स्थानकावरील तुतारी एक्सप्रेसमध्ये एका बॅगेत मृतदेह सापडला होता. त्यानंतर आता एका व्यक्तिने स्वच्छतागृहात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आहे.
हेदेखील वाचा- मावळ लोकसभा निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळली; बारणेंसह पराभूत उमेदवारांच्या विरोधात सुधारित याचिका दाखल
दादर रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे आलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एका व्यक्तिने मफलरच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. तसेच एक्सप्रेसचा देखील काही काळासाठी खोळंबा झाला होता. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एका 50 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळला आहे. मृतव्यक्तीने नंदीग्राम एक्सप्रेसमधील स्वच्छता गृहात मफलरच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतव्यक्ति मूळचा घाटकोपर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे संबंधित व्यक्ति मानसिक ताणावात होता, अशी माहिती मिळाली आहे. या मानसिक तणावातून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
हेदेखील वाचा- कुडाळमधील हळदीचे नेरूर फुटब्रीज पुलाला भगदाड; 7 वाड्यांच्या संपर्क सुटला
काही दिवसांपूर्वीच दादर रेल्वे स्थानकात थांबलेल्या तुतारी एक्स्प्रेसमध्ये एका ट्रॉली बॅगेत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुकबधिर आरोपी जय चावडा व शिवजीत सिंग या दोघांना अटक केली होती. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वर मुकबधिर आरोपी जय चावडा व शिवजीत सिंग हे दोघे ट्रॅव्हल ट्रॉली बॅग घेऊन जात होते. हे दोघेही तुतारी एक्सप्रेसने प्रवास करणार होते. या दोघांचाही संशय आल्याने पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली. यावेळी पोलिसांना त्यांच्या बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. अर्शद अली सादीक अली शेख या व्यक्तिची हत्या करून दोन्ही आरोपींनी मृतदेह बॅगेत कोंबला होता. आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हे तुतारी एक्सप्रेसने कोकणात जात होते. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानाने हे दोन्ही आरोपी पकडले गेले.