मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात २०२०-२१ या वर्षात ‘माझी वसुंधरा’ अभियानात सर्वोत्कृष्ट काम करत करणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपरिषदा, अमृत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा शनिवारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
“पर्यावरण जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला असून, विकासकामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे, अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देतो,” असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरणमंत्री व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वनविभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, माझी वसुंधरा अभियान संचालक सुधारक बोबडे, यांच्यासह अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी विभागयी आयुक्त, जि, गाव, शहर पातळीवरील कार्येकर्ते सहभागी झाले होते.
[read_also content=”Amazon ने लाँच केली विचित्र बिकीनी; यामुळे माजला हाहाकार, काही वेळातच प्रॉडक्ट हटवण्याची ओढवली नामुष्की https://www.navarashtra.com/latest-news/bikini-launched-by-amazon-the-product-had-to-be-deleted-immediately-nrvb-139055.html”]
वनविभाग कांदळवन कक्षाच्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्र’ या कॉफीटेबल फुंकणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. “आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. विकासाचा हा असा हव्यास जीवनाला अधिक घटक ठरत आहे. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला पटले. आपण त्याची निर्मिती करत आहोत; पण झाडांच्या रूपातील नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट उध्वस्त करत आहेत.वन, वन्यजीवन, पर्यावरणातील सूक्ष्म घटकांचे महत्त्व, त्यांचे रुप समजून घेऊन त्यांच्या संवर्धनाची गरज आहे. तिथे कोणीही कमी पडता कमा नये; असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
[read_also content=”Weather alert : पुढल्या दोन-तीन तासांमध्ये मुंबई आणि उपनगरात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता https://www.navarashtra.com/latest-news/weather-alert-monsoon-rain-in-mumbai-and-suburb-area-started-soon-nrvb-139028.html”]
तर पुरस्कारप्राप्त व अभियानात सहभागी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कामात सातत्य ठेवावे, इतरांना प्रेरणा देऊन माणसांना जगवणाऱ्या या कामात त्यांनाही सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही यावेळी भाषणे केली.
Our Indian culture has nurtured and nurtured the environment Chief Minister Uddhav Thackeray