मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price Updates) आज पुन्हा वाढताना दिसत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्याचा परिणाम हा आहे की त्याचा All Time High म्हणजेच महागाईच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ९९ रुपयांच्या पुढे गेला आहे.
४ मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग चार दिवस वाढविण्यात आल्या आहेत तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निवडणुकांमुळे पहिले १८ दिवस काही प्रमाणात स्थिर होत्या. मेमध्ये पेट्रोल आणि डिझेल १० वेळा महाग झाले आहे. मे महिन्यात आतापर्यंत दिल्लीत पेट्रोलचे दर २.४५ रुपयांनी वाढले आहेत तर डिझेल या महिन्यात २.७८ रुपयांनी महागले आहे.
यापूर्वी १५ एप्रिल रोजी महागड्या पेट्रोल आणि डिझेलमधून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. एप्रिलमध्ये आणि मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा कमी करण्यात आल्या होत्या. १५ एप्रिलपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल ३० मार्च २०२१ रोजी झाला. तर दिल्लीत पेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त झाले. मार्चमध्ये पेट्रोल ६१ पैसे स्वस्त झाले आणि डिझेलचे दर ६० पैशांनी कमी झाले. मार्च महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती ३ वेळा कमी करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलात झालेली घसरण होय.