पुणे : मुग्धाचे वैमानिक प्रशिक्षण ७ फेब्रुवारी २०१८ रोजी Middle Earth Flying School trading as New Zealand Aviation , Matamata या शिक्षण संस्थेत सुरु झाले. सुरवातीपासूनच तिने प्रशिक्षण दरम्यान व्हिसा अटीनुसार एक नोकरी करत होती आणि स्वतःचा मासिक खर्च ती स्वतः भागवत होती. ६ लिखित पेपर आणि प्रात्यक्षिक परिक्षा पास होऊन २६ एप्रिल २०१९ मध्ये मुग्धाला P.P.L.(खाजगी वैमानिक परवाना) मिळाला. जुलै २०१९ ला C. P. L. ( व्यावहारीक वैमानिक परवाना) चे ६ लिखित पेपर पास झाली आणि प्रात्यक्षिक परिक्षेसाठी नोंदणी झाली.
या स्कूल मधील मँनेजींग कमिटिच्या आर्थिक गैरव्यवहार तेथील सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे सरकारने ते स्कूल २९ आँगष्ट २०१९ ला बंद केले. तेथील सर्व विद्यार्थ्यांना Ardmore Flying School,आँकलँड या दुसऱ्या स्कूल मधे स्थानांतर केले. नवीन स्कूल मधे शिफ्ट झाल्यामुळे जुना व्हिसा रद्द झाला आणि नवीन व्हिसा साठी परत आवेदन करावे लागले. तसेच नवीन स्कूल मधे आल्यामुळे जुन्या स्कूल मधुन CPL ची प्रात्यक्षिक परिक्षेसाठी केलेली बुकिंग रद्द झाली आणि परत चालु दिवसामध्ये परत नवीन बुकिंग करावी लागली. नंतर कोरोना मुळे २७ एप्रिल २०२२ रोजी तीची प्रात्यक्षिक परिक्षा झाली आणि ती त्यात उत्तीर्ण होवुन तिला CPL व्यावहारिक वैमानिक परवाना मिळालेला आहे.
मुग्धा रेडकरचा जन्म २७ डिसेंबर १९९९ रोजी तीच्या आजोळी म्हणजेच चिंचवड, पुणे येथे झाला. २००६ पासून म्हणजेच वयाच्या ७ व्या वर्षा पासुन सुबल सरकार यांच्या नृत्यालिका मधुन भरत नाट्य हा नृत्य प्रकार शिकली. वयाच्या ७ व्या वर्षापासुन एलफिस्टन रोड येथील महाराष्ट्र कामगार कल्याण जलतरण तलाव येथे पोहण्याच्या ४ ही प्रकारात ( फ्रि स्टाईल, बँक स्ट्रोक, बटर फ्लाय,फ्राँग स्टाईल ) पारंगत झाली.
तिचे शालेय शिक्षण सेंट पाँल काँन्व्हेंट हायस्कूल दादर येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण विज्ञान शाखेतून महर्षी दयानंद महाविद्यालय परळ येथून केले.
तसेच वयाच्या ११ व्या वर्षी लिखीत परिक्षा आणि मुलाकात पास होऊन सि कँडेट कोर्स, नेव्हि नगर येथे जाऊ लागली, तेथेच तीने सि लिंक (शिडाची नौका चालवण्याचे) चे प्रशिक्षण घेतले. २००४ पासून म्हणजेच वयाच्या ५ व्या वर्षा पासुन शिवाजी पार्क, दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे संध्याकाळी ६ ते ७ जायची. मुग्धाचा पायलट होण्याचा कल पाहून त्यांनी सर्वप्रथम त्यासाठी लागणार्या वैद्यकीय चाचण्यांची माहिती करून घेतली आणि त्यातील डोळ्यांची महत्त्वाची कलर ब्लाइंड हि टेस्ट करून घेतली कारण हा प्रॉब्लेम असला तर तो जन्मतःच असतो नंतर होत नाही आणि हा प्रॉब्लेम असेल तर वैमानिक बनता येत नाही.






