Union Budget 2026: पुण्याच्या आर्थिक भवितव्याला नवी दिशा; पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी ; 'ग्रोथ हब' साठी ५ हजार कोटींची तरतूद
ग्रोथ हबच्या माध्यमातून पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान, उत्पादन, ऑटोमोबाईल, स्टार्टअप्स, संशोधन आणि सेवा क्षेत्रांना नवसंजीवनी मिळणार आहे. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि कौशल्यविकास यांचा समन्वय साधत शहराची औद्योगिक क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. परिणामी, पुण्याची ओळख केवळ ‘नॉलेज सिटी’ पुरती मर्यादित न राहता मॅन्युफॅक्चरिंग आणि इनोव्हेशन हब म्हणून अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ५१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन दैनंदिन प्रवास अधिक सुलभहोण्याची अपेक्षा आहे. यासोबतच मुंबई-पुणे कॉरिडॉर तसेच मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याच्या घोषणेमुळे पुण्याची राष्ट्रीय पातळीवरील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. या कॉरिडॉर साठी 10103 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रवासाचा वेळ कमी झाल्यास उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला थेट लाभ होईल, असे चित्र आहे.
Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त
ग्रोथ हबअंतर्गत होणाऱ्या गुंतवणुकीमुळे थेट आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही पातळ्यांवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्योगपूरक वातावरण तयार झाल्यास खासगी क्षेत्रातून अतिरिक्त गुंतवणूक पुण्याकडे वळण्याची शक्यता असून, याचा सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर दिसून येईल.
महिला, आरोग्य आणि शहरी नियोजन
प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी हॉस्टेल उभारण्याच्या योजनेमुळे पुण्यात शिक्षण व रोजगारासाठी येणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि परवडणारी निवासव्यवस्था उपलब्ध होणार आहे. आरोग्य क्षेत्रात जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅज्युअल्टी व ट्रॉमा सेंटर उभारण्याचा निर्णयही महत्त्वाचा मानला जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पाश्र्वभूमीवर आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी एकात्मिक शहरी नियोजनावर भर देण्यात आल्याने पुण्याच्या विस्ताराला नियोजनबद्ध दिशा मिळणार आहे. पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि गुंतवणूक यांचा समतोल साधत शाश्वत शहरी विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘पुणे ग्रोथ हब साठीची ५ हजार कोटींची तरतूद शहराच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीचा पाया मजबूत करणारी ठरणार असून, रोजगार, गुंतवणूक आणि पायाभूत विकासाच्या नव्या संधी पुण्यासाठी खुल्या होणार आहेत.
Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले
माधुरी मिसाळ, राज्यमंत्री
अर्थसंकल्यामुळे पुणे मेट्रो, पुणे ग्रोथ हब पुणे मुंबई पुणे हैदराबाद रेल्वे यामुळे पुणे आणि परिसराच्या विकासाला मोठी चालणार मिळणार आहे.
राजेश पांडे
पुणे ग्रोथ हव साठी पाच वर्षात पाच हजार कोटींचा निधी आणि पुणे मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वेमुळे पुणे महानगर प्रदेशाचा वेगाने विकास होईल.
पुणे ग्रोथ हंब व हायस्पीड रेल्वेचा पुर्ण परिसराला लाभ पुणे महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठीच्या ‘पुर्ण ग्रोथ हब ‘ला पाच वर्षात पाच हजार कोटीचा निधी मिळणार असून त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होईल. तसेच पुणे-मुंबई व पुणे-हैदराबाद या ‘हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर ‘मुळे पर्यावरणपूरक, गतिमान प्रवास साध्य होईलच परंतु, या संपूर्ण पट्टयातील परिसराचा वेगाने विकास होईल. त्याचा फायदा विविध क्षेत्रांना होईल.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
● पुणे शहरासाठी केलेली ही तरतूद पुणे शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी चा प्रयत्न आहे, यासाठी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करेल.
– सुनील कांबळे, आमदार पुणे कॅन्टोन्मेंट
66 पुणे ग्रोथ हब साठी 5000 कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे पुण्याच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. पुण्याच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा आहे.
– सिद्धार्थ शिरोळे, आमदार






