देशात कोरोनामुळे(Corona) विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू(Corona Death) झालेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून(dead bodies floating in river) आले आहेत. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(narendra modi) टीका केली आहे.
[read_also content=”अनंतनाग भागात चकमक – लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांना मारण्यात भारतीय जवानांना आलं यश https://www.navarashtra.com/latest-news/three-terrorist-of-lashkar-e-toyba-killed-in-anantnag-area-of-jammu-kashmir-nrsr-127243.html”]
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नदीत वाहून येणारे मृतदेह आणि रुग्णालयात दिसणाऱ्या परिस्थितीने जीवन सुरक्षेचा हक्क हिसकावला आहे. पंतप्रधान मोदीजी तो गुलाबी चष्मा काढा, ज्यामधून सेंट्रल व्हिस्टाशिवाय काहीच दिसत नाही.”
नदियों में बहते अनगिनत शव
अस्पतालों में लाइनें मीलों तक
जीवन सुरक्षा का छीना हक़!PM, वो गुलाबी चश्में उतारो जिससे सेंट्रल विस्टा के सिवा कुछ दिखता ही नहीं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 11, 2021
बिहारमधील चौशा शहरात गंगेच्या किनारी मृतदेह वाहून येत होते. गावकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाला यासंबंधी माहिती दिली. हे मृतदेह कोरोना रूग्णाचे असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
चौशा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार म्हणाले की, ४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते. हे मृतदेह पाण्यात फेकून दिले असावेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते. या सगळ्या प्रकारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
राम राज का सपना दिखाने वालों ने देश को राम भरोसे छोड दिया है . https://t.co/YgRAHi3zNW
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 10, 2021
नवाब मलिक यांनीही बिहारमधील घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.