Master blaster Sachin Tendulkar : भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीने संपूर्ण जगाला भुरळ घातली होती. मास्टर ब्लास्टरचा हा विक्रम अजूनही तसाच कायम आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 200 सामने खेळून 329 इंनिंग्स खेळल्या आहेत. त्याने 15921 धावा केल्या आहेत. तर सचिनने 68 हाफ सेंन्च्युरी मारल्या आहेत.
इंडियन क्रिकेटमध्ये प्रवेश
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा त्याच्या टेक्निकमुळे ओळखला जातो. वयाच्या 15 व्या वर्षी या महान फलंदाजाने इंडियन क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. भारतीय संघाच्या छावणीत सर्वात कमी वयाचा फलंदाज म्हणून सचिनचा विक्रम अजूनही अबाधित आहे. सचिन तेंडुलकरच्या अनेक अविस्मरणीय खेळी सांगता येतील ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना त्याने कायम खिळवून ठेवले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सचिनचे नाव कायम अजरामर राहणार आहे.
कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या या दिग्गज फलंदाजाने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शारदाश्रम शाळेत शिकणाऱ्या या महान फलंदाजाने अगदी बालवयातच आपली कौशल्य दाखवल्याने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले होते. वयाच्या 15 व्या वर्षी टीम इंडियामध्ये सामील होणाऱ्या या खेळाडूने आपले कौशल्य दाखवले.
आपल्या टेक्निकने सचिन तेंडुलकरने अनेक गोलंदाजांना पाणी पाजले. जागतिक क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरची टेक्निकल फलंदाजी सर्वांना मोहित करीत होती. सचिन तेंडुलकर नावाचे हे गारूड जगातील क्रिकेटप्रेमींवर जवळजवळ 3 दशके कायम होते.