लोकं रागाच्या भरात काय करतील याचा काही नेम नाही. नोकराने एखादी चूक केल्यावर त्याला मालकाने रागवणं किंवा कामावरून काढणं हे काही नवीन नाही. पण एका नोकराने नोकरी सोडल्यावर मालकाला एवढा राग आला की त्याने नोकराला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्याला मारहाण करुन त्याच्या पायाची नखे बाहेर काढण्यात आली. एवढ्यावरही त्याचा राग शांत नाही झाला तर त्याने घरातला कुत्रा त्याच्या अंगावर सोडला. एवढ्या अत्याचारानंतर 50 वर्षीय नोकराला आपला जीव गमवावा लागला.
[read_also content=”अनेक राज्यांमध्ये वादळी पाऊस, उत्तर प्रदेशमध्ये 20 जणांचा मृत्यू, आजही ‘या’ ठिकाणी रेड अलर्ट! https://www.navarashtra.com/india/heavy-rains-occurred-in-various-states-of-north-west-including-uttar-pradesh-457013.html”]
हे संपूर्ण प्रकरण कानपूरच्या रावतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, कच्ची मधैया येथील एम ब्लॉकमध्ये राहणारा बिट्टू (५०) एका गेस्ट हाऊसमध्ये काम करत होता. मात्र तिथला पगार कमी असल्याने तो नोकरी सोडून जवळच्या खासगी रुग्णालयात काम करू लागला. गेस्ट हाऊस मालकाचा मुलगा बिट्टूवर त्याला नोकरीवर परतण्यासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र बिट्टूने त्याचे ऐकले नाही. याचा राग आल्याने गेस्ट हाऊस मालकाच्या मुलाने बिट्टूला मारहाण केल्याचा आरोप आहे.
6 सप्टेंबरच्या संध्याकाळी गेस्ट हाऊस मालकाच्या मुलाने बिट्टूचे अपहरण केल्याचा आरोप बिट्टूच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर त्याच्या इतर अनोळखी साथीदारांसह त्याला बेदम मारहाण केली. यावेळी बिट्टूच्या पायाचे नखे उपटून त्याच्या अंगावर कुत्रा सोडला त्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला. बिट्टू अर्धमेला झाल्यानंतर त्यांनी त्याला घराजवळ फेकून दिले आणि तेथून निघून गेले.
सकाळी सफाई कामगाराने पाहिल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी बिट्टूला तात्काळ कानपूरच्या हलत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, कुटुंबीयांनी याची माहिती रावतपूर पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर रोजी दिली. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपींसह तिघांनाही अटक करण्यात आली आहे. एमाल चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याची बाबही समोर आली आहे.