शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत चोरीस गेलेले व गहाळ झालेले तब्बल 60 मोबाईलचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन संबंधित नागरिकांना संपर्क साधून ते मोबाईल नागरिकांना परत केले आहेत. शांतीनगर पोलीस ठाणे येथे चोरी व गहाळ झालेले मोबाईल यांचा शोध घेण्याकरीता एक पथक नेमण्यात आले होते. त्यांनी चोरी व गहाळ झालेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे व तांत्रिक तपास करुन चोरीस गहाळ झालेल्या मोबाईल एकुण 60 मोबाईल शोधुन काढले. दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या शुभहस्ते ही 12 लाख रुपये किमतीच मोबाईल नागरिकांना सुपूर्द केले.