मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थानी सव्वा तास झालेल्या चर्चेत महाविकास आघाडी समोर असलेल्या विविध प्रश्नाबाबत तसेच गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मतभेदांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मागील दोन आठवड्यापासून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांना या बैठकीत पूर्ण विराम देण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी आणि सरकारमध्ये बिघडलेल्या समन्वयानंतर झालेली ही बैठक त्यामुळे महत्वाची समजली जात आहे.
यापूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या या दोन प्रमुख नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून दूरावा आणि नाराजी नाट्य सुरू होते. त्यात काँग्रेसच्या स्वबळाचा नारा, त्यावर मुख्यमंत्र्यांनी वर्धापनदिनी केलेले भाष्य यांची भर पडल्याचे सांगण्यात येत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा न करता त्यांनी घेतलेल्या टाटा रूग्णालयाला दिलेल्या सदनिकाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती, आणि जनतेचा विरोध डावलून सात त्याने लादले जाणारे निर्बंध या मुद्यावर पवार यांची नाराजी होती.
याच मुद्यांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शरद पवार यांना आजच्या भेटीसाठी राजी केल्याचे मानले जात आहे त्यानंतर आज संध्याकाळी शरद पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास सव्वा तास या दोघांमध्ये या सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यापूर्वी पवार यांचे विश्वासु दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे यांच्यातही बैठक झाली. येत्या सोमवारी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या अधिवेशनात महाविकास आघाडीत समन्वय असावा याबाबतही या भेटी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर महाविकास आघाडीतील मतभेद दूर होतील अशी शक्यता आहे.
[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]
[read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]
[read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]
[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]
[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]
[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]
[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]
[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]