प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का ? पाहा Video
प्राजक्ता माळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि फॅशनच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकतंच प्राजक्ता माळीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून नवोदित कवयित्री म्हणून ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आलं आहे. प्राजक्ता माळीच्या पहिल्यावहिल्या ‘प्राजक्तप्रभा’ या कवितासंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे. पुण्यात झालेल्या ह्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीने तिची एक कविता सादर केली. प्राजक्ताच्या या कवितेचं नाव ‘मुंबई-पुणे-मुंबई’ असं असून तिने कविता सादर करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
‘लाफ्टर शेफ’ मनोरंजनासाठी सज्ज; स्पर्धकांची नावे उघड, होणार नवीन चेहऱ्यांचा समावेश!
प्राजक्ता माळीची ‘मुंबई-पुणे-मुंबई’ कविता
पुणे-मुंबई-पुणे नाही आता ‘मुंबई-पुणे-मुंबई’ असा प्रवास करतो आम्ही…
जरी वाढलो पुण्यात, तरी कामानिमित्त मुंबईला राहतो हे अभिमानानं सांगतो आम्ही…
पुणं कठोर, कर्तव्यदक्ष… चुकल्यास कान पिळणाऱ्या बापासारखं…
तर मुंबई…सर्वांना मायेनं सांभाळून घेणारी आई वाटते आम्हांस…
आम्हाला सतत धावणारी, उत्साहानं भारलेली मुंबई आवडतेच…
आणि निवांत, मोकळढाकळं पुणंही खास…
चालत असतानाही, थांबून पत्ता सांगणाऱ्या ‘Helpfull’ मुंबईकरांचं कौतुक…
आणि spoon feeding न करता मेंदूचा उपयोग करायला भाग पाडणाऱ्या पुणेकरांचंही रास्त…कामासमोर तहानभूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर…
आणि ज्या पोटासाठी सगळी उठाठेव चाललीय तिकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्यांचंही बरोबर…
कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही १-४ झोपणाऱ्या अशा दोन्ही शहरात व्यवस्थित Adjust होतो आम्ही…
मुंबईचं ट्राफिक आणि पुणेरी पाट्या अशा दोन्हीकडच्या कोपरखळ्या गोड हसत पचवतो आम्ही…
मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ Diet बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही…
अहो, एवढंच नाही…तर ह्या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या Expresswayच्याही प्रेमात आहोत आम्ही…
एक शहर Extra self respect शिकवतं.. दुसरं Extra flexibility
एकीकडे डोंगरमाथा दुसरीकडे समुद्र खाडी…
खरं तर नशीबवान आहोत, अशा दोन्ही शहरांच्या सानिध्यात वाढतोय…
सांस्कृतिक-आर्थिक अशा सगळ्या बाजूंनी प्रगल्भ होतोय…
प्राजक्ता माळीची ही मुंबई आणि पुण्यावरची नवीन कविता चाहत्यांच्या पसंदीस पडली आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काही सेलिब्रिटींनीही प्राजक्ताच्या या कवितेला दाद दिली आहे.