खासदार सुनील तटकरे (फोटो- सोशल मीडिया)
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार अशी शक्यता
सुनील तटकरे यांनी केले विधान
Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. काल बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, “अजितदादांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून आम्ही कोणीही सावरलो नाही. अजूनही दादा आमच्यात आहेत असे आम्हाला वाटत आहे. त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे माझ्यासाठी क्लेशदायक आहे. सर्व परिवाराशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही ठरवू. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकमग्न आहे. उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. धार्मिक विधी झाल्यानंतर सुनेत्रा पवारांशी चर्चा करून निर्णय घेऊ.”






