पुणे : कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही. असे वक्तव्य काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल केले होते.
त्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पुण्यात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. हे आंदोलन गुडलक चौक, डेक्कन येथे करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी केले.
संजय मोरे म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुजरात, राजस्थानची लोक महाराष्ट्रातून निघून गेली तर महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही. हे म्हणून महाराष्ट्राचा त्यांनी पुन्हा एकदा अपमान करून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावल्या व भडकवलेल्या आहेत. राज्यपालांनी दोन-तीन वेळा असेच वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांना या पदावर राहण्याचा कोणताच अधिकार नाही. राज्यपाल हे भाज्यपाल आहेत. भाजपाल राज्यपालांनी पायउतार व्हावं. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी आम्ही आंदोलनातून करत आहोत. असे संजय मोरे म्हणाले.
[read_also content=”20 व्या मजल्यावरून खाली पडूनही महिला जिवंत, कसं घडली घटना? : जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/woman-alive-after-falling-from-20th-floor-how-did-the-incident-happen-know-in-detail-nrdm-309936.html”]
या आंदोलनाला शिवसेनेचे गजानन थरकुडे, किशोर राजपूत, युवराज पारिक, तानाजी लोकरे, आबा कुंभारकर, कल्पना थोरवे, सविता मते, सीमा गायकवाड, श्रुती नाजीरकर, विजय जोरी, भरत आबा कुंभारकर, बाळकृष्ण वांजळे, योगेश पवार, सचिन मोहिते,संगीता ठोसर, विजया मोहिते व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.