मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांची शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेली दुसरी मुलाखत आज प्रसारीत झाली. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. उद्या हे स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाला सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ठाकरे म्हणाले, प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वतःला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. भाजपावाल्यांनो सावधान. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे
[read_also content=”शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, दुसऱ्या मुलाखतीत उद्धव ठाकरे सडेतोड https://www.navarashtra.com/maharashtra/udhhav-thackray-challange-to-eknath-shinde-in-second-interview-by-sanjay-raut-saamna-nrps-308505.html”]
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता, असं ठाकरे म्हणाले.