सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. व्हायरल होण्यासाठी लोक हव्या तितक्या खालच्या पातळीवर जाण्यास तयार असतात. अनेकजण काहीतरी अतरंगी करून स्वतःला व्हायरल कारण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र हे प्रयत्न जीवघेणेही ठरू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा व्हायरल व्हिडिओ. तरुणीने चक्क लिंबाचा रस आपल्या डोळ्यात टाकला आणि मग शेवटी जे व्हायचे तेच झाले… याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओच्या सुरवातीलाच आपल्याला एक तरुणी दिसते जी आपल्या हातात एक लिंबाची फोड घेऊन उभी असते.यांनतर पुढच्याच क्षणी ही तरुणी आपल्या डोळ्यात लिंबाचा रस टाकू लागते. मात्र डोळ्यांसारख्या संवेदनशील अवयवाशी खेळणे या तरुणीला चांगलेच महागात पडते. पुढे व्हिडिओत पाहिले तर दिसते की, लिंबाचे काही थेंब डोळ्यात जाताच तरुणीला तीव्र वेदना होऊ लागतात आणि ती जवळीत कपडा डोळ्यावर लावून ओरडू लागते. तिची स्थिती पाहताच तिला किती वेदना होत असतील याची प्रचिती येते. शेवटपर्यंत तरुणी डोळ्यांना कपडा लावून ओरडत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत.
हेदेखील वाचा – जंगलात सापडली वर्षानुवर्षे जुनी रहस्यमयी विहीर! आत कॅमेरा टाकला अन् पाहून सर्वांचाच थरकाप उडाला
व्हिडिओ पाहूनच अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. तसेच अनेकांच्या यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तरुणीने केलेली अतिउत्साही स्टंट तिच्यावर पलटला, त्यामुळेच कधीही असे विचित्र स्टंट चुकूनही करू नये. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @NeverteIImeodd नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक युजर्सने कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, पुढे काय झालं तिला तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, तिने असे का केले?
Whyyyyyyyyyyy, would you do that !!citrus in your eye !!!
— William V (@VezertzisV) July 31, 2024
आता अनेकांना तरुणीने असे का केले असा प्रश्न पडला आहे. दरम्यान यांनतर तरुणीचे काय झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या व्हिडिओला 1 कोटी 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी यावर लाइक्स दिल्या आहेत. बहुदा लोक व्हायरल होण्यासाठी असे काही तरी करतात आणि मग तोंडावर पडतात. व्हिडिओतील तरुणीनेही असेच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तिला चांगलाच परिणाम भोगावा लागला.