पुरुषांचा स्टॅमिना वाढविण्यासाठी काय खावे
दुबळे शरीर, अगदी साधी कामे करूनही थकवा येणे, धाप लागणे, शुक्राणूंची कमतरता ही पुरुषांच्या अशक्तपणाची लक्षणे आहेत. वयाच्या 25 वर्षानंतर या समस्या वाढू लागतात. परंतु जे पुरुष आवश्यक पोषणाची काळजी घेत नाहीत, त्यांना वेळेपूर्वीच या समस्या उद्भवू लागतात. हे तारुण्य संपल्याचे लक्षण आहे आणि कोणत्याही पुरुषासाठी असा अशक्तपणा हा एखाद्या शापाप्रमाणेच आहे
परंतु वयाच्या २५ वर्षानंतर पुरुष काही आरोग्यदायी पदार्थ खाण्यास सुरुवात करू शकतात. यामध्ये काही बियांचा समावेशदेखील करू शकतात. शारीरिक शक्ती वाढवण्यासोबतच वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या समस्यांपासूनही संरक्षण मिळते. या बियांच्या मदतीने शरीराला आतून नेहमीच तरुण ठेवता येते. पोषणतज्ज्ञ रिद्धी पटेल यांनी सांगितले की 25 नंतर प्रत्येक पुरुषाने 3 बियांचे सेवन केले पाहिजे. परंतु त्यांचे फायदे मिळविण्यासाठी, ते योग्यरित्या खाणे महत्वाचे आहे. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
पुरुषांसाठी आळशीचे फायदे
आळशी खाण्याचे फायदे काय आहेत
पोषणतज्ज्ञांच्या मते पुरुषांनी अंबाडीच्या बिया खाव्यात. त्यांना फ्लेक्स सीड्स अथवा आळशी असेही म्हणतात. अळशीच्या बिया शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता वाढविण्यात मदत करते. दुपारच्या जेवणाच्या सुमारे 30 मिनिटे आधी हे खा ज्याचा फायदा पुरुषांना नक्कीच होऊ शकतो. तुम्ही 25 वय पूर्ण केले असेल तर अळशीच्या बियांचे नियमित सेवन तुमच्या शरीराला अधिक ताकद मिळवून देण्यास फायदेशीर ठरते
पुरुषांच्या शरीरात खरा Stamina आणि उत्साह भरेल हे फळ, मुळापर्यंत पोहचेल विटामिन, सळसळेल रक्त
अळीव
पुरूषांनी स्टॅमिनासाठी खावे अळीव
हलीम अथवा ज्याला अळीव असे म्हटले जाते त्याच्या बिया खाल्ल्या आहेत का? पुरुषांच्या आरोग्यासाठी आळीवाच्या बिया फायदेशीर आहे. पोषणतज्ज्ञांच्या मते, आळिवाच्या बिया त्यांचे रक्त परिसंचरण सुधारतात आणि केस गळणे कमी करण्यास मदत करतात. याचे सेवन करण्यासाठी चिमूटभर आळीव बिया 6 ते 8 तास पाण्यात भिजवाव्यात आणि नंतर दुधासोबत घ्याव्यात. तुम्ही नियमित १ कप आळीवाची खीर करूनही खाऊ शकता. मात्र यात साखरेऐवजी तुम्ही गूळ मिक्स करून तयार करावे आणि खावे, हे चवीला तर उत्तम लागतेच पण त्याचा पुरुषांच्या शरीरालाही फायदा मिळतो
चिया सीड्स
नियमित खा चिया सीड्स
पोषणतज्ज्ञांनी चिया सीड्सचा उपयोग पुरुषांसाठी सर्वात शक्तिशाली मानले आहे. त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत करतात. चिया सीड्स खाण्यापूर्वी नेहमी 45 मिनिटे पाण्यात भिजवा. रोज सकाळी तुम्ही भिजलेल्या चिया सीड्स दुधातूनदेखील खाऊ शकता. दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहते आणि त्याशिवाय शरीरात कोणत्याही प्रकारचा कमकुवतपणा जाणवत नाही.
शारीरिक संबंधादरम्यानही पुरुषांमध्ये राहील Stamina, देशी पदार्थांचा करा आहारात समावेश
पुरुषांचा कमकुवतपणा कमी करण्यासाठी बिया
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.