यंदाच्या वर्षी गुगलवर सार्वधिक शोधण्यात आलेले पदार्थ
भारतीय जेवणातील पदार्थ जगभरात सगळीकडे खूप प्रसिद्ध आहेत. कोणताही नवीन पदार्थ शोधण्यासाठी आणि नवीन रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी गुगलचा वापर केला जातो. गुगलवर जाऊन नवीन रेसिपी शोधली जाते. शिवाय ती रेसिपी कश्या पद्धतीने तयार करावी, याबद्दल सुद्धा गुगलवर मोठ्या प्रमाणावर माहिती मिळते. नवीन कॉफीचे नाव शोधण्यापासून ते घरी आणलेली डाळ किंवा तांदूळ कशा पद्धतीने आणि किती पाणी घालून शिजवावे इत्यादी सर्व गोष्टींची माहिती गुगलवर सहज उपलब्ध होते. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुगल सर्च इंजिनचा वापर केला जातो. यामुळे नवनवीन माहिती उपलब्ध होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यंदाच्या वर्षी गुगलवर कोणते पदार्थ सार्वधिक शोधण्यात आले, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
जगभरात अनेक वेगवेगळे पदार्थ मोठ्या प्रमाणावर फेमस आहेत. मात्र यंदाच्या वर्षी गुगलवर सार्वधिक सर्च करण्यात आलेल्या पदार्थामध्ये पोर्नस्टार मार्टिनी य पदार्थांचे नाव आहे. या पदार्थाचे नाव जरी युनिक असले तरीसुद्धा हा पदार्थ गुगलवर सर्वाधिक शोधण्यात आला होता. लंडनमधील लॅब बारसाठी डग्लस अंक्राह यांनी तयार केलेले हे टर्न-ऑफ-द-मिलेनियम कॉकटेल हा पदार्थ गुगलच्या यादीमध्ये अग्रस्थानी आहे. व्हॅनिला व्होडका, पॅशन फ्रूट लिकर, व्हॅनिला साखरेसह बनवलेले आणि सामान्यत: बाजूला शॅम्पेन किंवा प्रोसेकोच्या थंडगार शॉटसह सर्व्ह केले जाते, 1999 मध्ये हा पदार्थ तयार करण्यात आला होता.
आंब्याचं लोणचं सगळ्यांच खूप आवडत. आंबट गोड चवीचे लोणचं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच घरांमध्ये बनवले जाते. लोणचं बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. शिवाय लोणचं हा पदार्थ अधिक काळ चांगला टिकून राहतो. भारतासह इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवली जातात.कैरी, लिंबू, आवळा, मिरची, लसूण इत्यादी पदार्थांपासून लोणचं तयार केलं जात.
जन्माष्टमीच्या प्रसादामध्ये धनिया पंजिरी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. हा पदार्थ बनवण्यासाठी शेंगदाणे, काजू बदाम, वेलची पावडर, गूळ इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. शिवाय हा पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टीक आहे. यामध्ये अनेक प्रकारचे हर्बल घटक वापरले जातात. शिवाय तुपाने भरलेला हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
दक्षिण भारतामध्ये उगाडी पचडी हा पदार्थ बनवला जातो. कापणीच्या दिवसांमध्ये हा पदार्थ प्रामुख्याने तयार केला जातो. कच्चा आंबा, चिंच, गूळ, मीठ, हिरवी मिरची, कडुलिंबाची पाने आणि पाण्याचा वापर करून हे पेय तयार केले जाते. यंदाच्या वर्षी हा पदार्थ गुगलवर सार्वधिक सर्च करण्यात आला होता.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
कांजी हे पेय उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. कांजी बनवण्यासाठी पाणी, काळी गाजर, बीटरूट, मोहरी आणि हिंगाचा वापर केला जातो. तसेच यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोबायोटिक्स आढळून येतात, ज्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. या पेयांची चव तिखट असली तरीसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे.