कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या डाळी ठरतील उत्तम (फोटो सौजन्य - iStock)
आयुर्वेद हा भारतातील सर्वात चांगला उपाय कोणत्याही आजारावर मानला जातो आणि आयुर्वेद हे साधारण पाच हजार वर्षे जुन असल्याचेही मानले जाते. कोणत्या आजारावर कोणती वनस्पती वा कोणते पदार्थ उत्तम ठरतात आणि रामबाण ठरतात याबाबत आयुर्वेदात त्याची शक्ती आणि ते खाण्याची पद्धत वर्णन केली आहे. रक्तातील उच्च साखर, उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल, अशक्तपणा इत्यादी आजारांवर आयुर्वेदाच्या मदतीने उपचार करता येतात. आयुर्वेदात डाळींना खूप शक्तिशाली अन्न मानले जाते.
वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयुक्त आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी निवडू शकता, असे मॉडर्न न्यूट्रिशन आणि आयुर्वेदात पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या ईशा लाल यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितले आहे, यासाठी कोणत्या डाळींचा आपल्या आहारात समावेश करून घ्यायला हवा हे आपण आज जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
मसूर डाळ
मसूर डाळीचे फायदे
तुमच्या शरीरात जर लोहाची कमतरता असेल तर मसूर डाळ खाणे अत्यंत उत्तम ठरते. आयुर्वेदात याला रक्तवर्धक मानले जाते. तुम्ही मसूर डाळ शिजवून त्यात तूप, हिंग आणि ओव्याची फोडणी देऊन खाऊ शकता. मसूर डाळ एनिमिया आणि मासिक पाळीत होणाऱ्या जास्त रक्तस्रावावरील उत्तम उपाय आहे. ईशा लाल यांच्या सांगण्यानुसार ही डाळ लोह आणि फोलेटयुक्त असून थकवा आणि नखांचे त्रास कमी करण्यास मदत करते.
चण्याची डाळ
चणाडाळीचे आरोग्यासाठी फायदे
चणा डाळ ही प्रोटीनयुक्त असून कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारी डाळ आहे. तुम्ही ही चणाडाळ शिजवून त्यात मेथी दाणे आणि जिऱ्याची फोडणी देऊन खआऊ शकता. आयुर्वेदानुसार चणाडाळीमुळे ब्लड शुगर आणि शरीरात झालेला कफ संतुलित होण्यास मदत मिळते. तसंच सतत गोड खाण्याची होणारी क्रेविंग आणि शुगर क्रॅशपासूनच तुम्ही वाचू शकता.
वितळू लागेल नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल, रोज सकाळी उठताच पाण्यात मिसळून प्या 3 मसाले
उडीद डाळ
उडीद डाळीचे फायदे
उडीद डाळ खाल्ल्याने तुमच्या हाडांमध्ये अधिक ताकद येते. उडीद डाळीमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम असून आयुर्वेदानुसार हाडांचा त्रास काढून टाकून हाडे जोडण्यास आणि हाडांची ताकद वाढविण्यास याची मदत मिळते. साधारण 40 वयाच्या वरील महिलांसाठी ही डाळ उत्तम मानली जाते. उडीद डाळ वापरून तुम्ही तूप, सुंठ आणि मिरचीचा वापर करून फोडणी घालून आमटी करू शकता.
हिरवी मूगडाळ
हिरवी मूगडाळ कशी वापराल
हिरवी मूगडाळ ही सॉल्युबल फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त असून हाय कोलेस्ट्रॉल, टॉक्सिन आणि अतिरिक्त फॅट्स शरीराबाहेर काढण्यास उपयुक्त ठरते. उच्च LDL कोलेस्ट्रॉल शरीरात जास्त असेल तर हार्ट अटॅक येऊ शकतो आणि आयुर्वेदात त्रिदोष संतुलित करण्यासाठी आणि लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हिरव्या मुगडाळीचा वापर करणे उत्तम मानले जाते. हिरव्या मुगडाळीला मोड आणून तुम्ही त्याचा वापर करावा. याशिवाय त्यात कांदा, बडिशेप, कोथिंबीर मिक्स करून तुम्ही मूगडाळ चिला करूनही खाऊ शकता.
तूरडाळीचा वापर
तूरडाळीचे फायदे
तूरडाळ ही हार्टसाठी उत्तम मानली जाते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम असून नसा रिलॅक्स करण्यासाठी आणि रक्तदाब उच्च होण्यापासून वाचविण्यासाठी उत्तम ठरते. हार्ट अटॅकपासून तुम्ही दूर राहण्यासाठी नियमित तूरडाळीची आमटी खावी. आयुर्वेदातही तूरडाळीला अनन्यसाधाऱण महत्त्व देण्यात आलंय. तेल, तूप, जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्ता आणि कोकम फोडणी लाऊन तुम्ही तुरडाळीची आमटी खाऊ शकता.
पिवळी मूगडाळ
पिवळ्या मुगडाळीचा वापर
अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत मूगडाळीचा उत्तम उपयोग होतो. पचायला हलकी असणारी ही डाळ अगदी आजारपणातही खाणे उत्तम ठरते. IBS आणि ब्लोटिंगची समस्या असल्यास नियमित पिवळी मूगडाळ खावी. तसंच आयुर्वेदानुसार, मूगडाळ ही पोटाला थंडावा देणारी आणि वात प्रकृती संतुलित राखणारी आहे. हिंग, आलं, हळद, जिरा, तूप यांची फोडणी देऊन तुम्ही ही डाळ खाऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.