बदलत्या ऋतूंमध्ये आजारपण का वाढते? शरीराची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे उपाय
हवामानातील बदलांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?
शरीराची काळजी कशी घ्यावी?
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे?
वर्षाच्या बाराही महिने वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. सर्दी, खोकला, ताप इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. हवामानातील बदल, जीवाणू-विषाणूंचा संसर्ग आणि चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर थेट परिणाम करतो. ज्याच्या परिणामामुळे काहीवेळा शरीराला गंभीर आजारांची लागण होते. शरीराचे संतुलन बिघडल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करून शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आजारपण का वाढते? शरीराची काळजी घेण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
ऋतूमध्ये बदल झाल्यानंतर हवामानात सुद्धा अनेक बदल होतात. हे बदल थेट शरीरावर परिणाम करतात. थोडासा पाऊस पडून गेल्यानंतर काहींना लगेच सर्दी, खोकला होतो. कितीही उपाय केले तरीसुद्धा सर्दी खोकला थांबत नाही. बाहेरील वातावरण बदलल्यानंतर सुद्धा शरीर आतून स्वतःचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करते. याला होमियोस्टॅसिस असे म्हणतात. बाहेरच्या वातावरणातील बदलांमुळे किंवा संसर्गामुळे शरीराच्या यंत्रणेत अनेक बिघाड होतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे इम्युनोग्लोब्युलिन नावाच्या प्रथिनांच्या मदतीने विषाणू आणि जीवाणूंशी लढले जाते.
सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शरीरात काहीवेळा पित्त वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे ऍसिडिटी, अपचन होऊन वारंवार डोकेदुखी, उलट्या, मळमळ जाणवू लागतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीराला पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट्सची खूप जास्त आवश्यकता असते.
पावसाळ्यात हवा आणि पाण्याद्वारे पसरणाऱ्या जिवाणू आणि विषाणूंचा जास्त धोका असतो. हे विषाणू थेट रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतात. संसर्गाची पातळी वाढल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. डेंग्यू, मलेरिया, कावीळ इत्यादी आजार दूषित पाण्याच्या सेवनामुळे होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी.
हिवाळ्यातील दमट आणि कमी तापमानामुळे विषाणूंची वाढ वेगाने होते. परागकण आणि थंड हवा संवेदनशील असलेल्या व्यक्तींच्या शरीरावर थेट परिणाम करते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. या दिवसांमध्ये हार्ट अटॅक आणिश्वासांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात.
कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार्शक्ती वाढवणे फार आवश्यक आहे. दैनंदिन आहारात पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, सुका मेवा, वेगवेगळ्या सीड्स, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच दुग्धजन्य पदार्थ, अंड्याचा पांढरा भाग आणि मासे इत्यादी पदार्थांमधून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.
Ans: हवामानातील अचानक बदलामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो.
Ans: सर्दी, खोकला, ताप, फ्लू, त्वचेचे संसर्ग आणि पोटाचे विकार या काळात जास्त दिसून येतात.
Ans: हात स्वच्छ ठेवणे, उकळलेले पाणी पिणे, गर्दी टाळणे आणि स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.






