मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा, आता प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर
लोकसभेत महिला आरक्षण फेटाळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, विरोधकांनी ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला आहे. महिला संसेदत जास्त निवडून येतील, याची रचना विधेयकात करण्यात आली होती.
“TMC ला जास्त महिला खासदार नको होत्या…; महिला आरक्षणावरुन PM मोदींचा विश्वासघाताचा आरोप
विरोधकांनी महिला विरोधातील मानसिकता दाखवली. विधेयकाला सर्वजण मदत करतील, असे वाटले होते. दक्षिण भारतीय राज्यांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी वेगळा निर्णय घेण्यात आला होता. संसदेत परवा आलेली विधेयक अचानक आलेली नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम करण्यात आले.
त्यांना महिलांना आरक्षण द्यायचे नाही, काहीही झाले तरी ते त्याचा विरोध करतील. विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलले. यावेळी विरोधकांवर जोरदार टीका करताना देवेंद्र फडणवीस दिसले.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिला शक्तीचा सर्वात मोठा अपमान विरोधी पक्षांकडून होतो. मोदींनी असा उत्तर-दक्षिण भेदभाव निर्माण केला नाही. विरोध ठरवून आले होते की, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे बील मंजूर होऊ द्यायचेच नाही.
दरम्यान, महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचना यांच्याशी संबंधित १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत फेटाळण्यात आले. यानंतर, पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयाने, गृहमंत्री अमित शाह यांनी त्या दिवशी संसदेत विरोधी पक्षाकडे एक तास का मागितला होता, हे स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. जम्मू आणि काश्मीरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, “जेव्हा लोकसभेत विधेयक फेटाळण्यात आले, तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. शेवटच्या क्षणी, गृहमंत्री अमित शाह यांनी सूचनांचा समावेश करण्यासाठी एक तास मागितला, परंतु त्यांनी (विरोधी पक्षांनी) एकमताने ते नाकारले आणि निकालाच्या घोषणेचा वापर केवळ चर्चेला भरकटवण्यासाठी केला.”






