(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘Border 2’च्या कमाईत सातव्या दिवशीही घसरण, तरीही Worldwide Collection मध्ये 300 कोटींचा टप्पा पार
या चित्रपटाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मराठमोळी बालकलाकार अवनी जोशी हिची दमदार उपस्थिती. अवनी या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी तिला या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली आहे. आजवर अवनी जोशी हिने अनेक मराठी मालिका, रिॲलिटी शो तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जारण’ या चित्रपटामधून आपल्या अभिनयाची उत्तम झलक दाखवली आहे. विशेष म्हणजे अवनी ही सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि गायिका रसिका जोशी यांची कन्या आहे.
या चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना अवनीने सांगितले की, यशराज फिल्म्सच्या टीमकडून तिला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. अनेक टप्प्यांतून गेलेल्या ऑडिशन प्रक्रियेनंतर तिने हा रोल मिळवला. चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिकेत असून, राणी मुखर्जींसह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत शिकवणारा आणि संस्मरणीय ठरल्याचे तिने सांगितले. तसेच, चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रेक्षक चित्रपटालाही तितकाच उत्तम प्रतिसाद देतील, अशी आशा अवनी जोशीने व्यक्त केली आहे.
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थीवर 11.5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल
‘मर्दानी’ (पहिला चित्रपट) देशातील मानवी तस्करीचे भयानक सत्य उघड करत असताना, ‘मर्दानी २’ ने आपल्याला एका मनोरुग्ण सिरीयल बलात्कारीच्या भयानक मनात नेले ज्याने व्यवस्थेला आव्हान देण्याचे धाडस केले. ‘मर्दानी ३’ आपल्या समाजातील एक भयानक सत्य उघड करण्यासाठी सज्ज आहे. तसेच हा चित्रपट आज ३० जानेवारीला प्रदर्शित झाला आहे.






