कडुलिंबाच्या पानांपासून सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा वॅक्सिंग
सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर दिसण्यासाठी महिला हेअर स्पा, हेअर केअर ट्रीटमेंट, वॅक्सिंग, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी करतात. शरीरावर वाढलेले अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीमचा वापर करून हात आणि पायांवरील केस काढले जातात. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त वॅक्सिंगमुळे त्वचा खराब होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय वॅक्स गरम झाल्यानंतर त्वचा लाल होणे किंवा त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला कडुलिंबाच्या पानांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी वॅक्सिंग करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने वॅक्सिंग केल्यास त्वचा कधीच खराब होणार नाही.(फोटो सौजन्य – iStock)
कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म त्वचेवरील बॅक्टरीया कमी करण्यास मदत करतात. कडुलिंबाची पाने आरोग्य आणि सौंदर्यसाठी विशेषता वापरली जातात. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली कडुलिंबाची पाने अंगावर पुरळ, त्वचेवरील फोड किंवा मुरुमांचे डाग घालवण्यासाठी मदत करतात. केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करून त्वचेचे नुकसान करून घेण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. नैसर्गिक गुणधर्म असलेली कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घाण स्वच्छ होते आणि चेहरा सुंदर आणि उजळदार दिसू लागतो.
हातापायांवर वाढलेले अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. मात्र वॅक्सिंग केल्यामुळे त्वचेवरील केस निघून जातात पण त्वचा मात्र अतिशय रुक्ष आणि कोरडी होऊन जाते. चॉक्लेट वॅक्स, एलोवेरा वॅक्स इत्यादी अनेक वेगवेगळे वॅक्स वापरले जातात. पण काहींची त्वचा अतिशय संवेदनशील किंवा नाजूक असते. त्यामुळे त्यांना त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. कडुलिंबाची पाने त्वचेला कोणतेही हानी पोहचवता त्वचा स्वच्छ करण्यासाठीं मदत करतात.
वाढत्या उन्हाळ्यात तेलकट त्वचेची ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल होईल कमी
वॅक्स करताना सगळ्यात आधी तयार केलेले वॅक्स हलकेसे थंड झाल्यानंतर त्वचेवर लावून घ्या. त्यानंतर वॅक्सच्या पटीने ओढून घ्या. यामुळे तुमचे केस सहज निघतील आणि हातापायांच्या त्वचेला कोणतीही इजा होणार नाही. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करतात. त्वचेवरील जंतुसंसर्ग, पुरळ, मुरुम, फोड घालवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा.