केसांमध्ये वाढलेला कोंडा सतत खांद्यांवर पडतो? तेल शॅम्पूचा वापर करण्याऐवजी 'या' पदार्थाचा करा वापर
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये महिला आणि पुरुषांच्या डोक्यात कोंडा होतो. कोंडा झाल्यानंतर केसांमध्ये सतत खाज येणे, केस गळणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय केसांमध्ये झालेल्या कोंड्यांमुळे चेहऱ्यावर बारीक पिंपल्स येऊ लागतात. हे पिंपल्स त्वचेवरून लगेच जात नाही. बऱ्याचदा महिला केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रीटमेंट, शॅम्पूचा वापर, हेअर मास्क इत्यादी अनेक प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जातो. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या ट्रीटमेंट काहींना सूट होत नाही. त्यामुळे कोणतीही हेअर ट्रीटमेंट करताना योग्य विचार करूनच कारवी.(फोटो सौजन्य – iStock)
केसांमध्ये कोंडा जास्त झाल्यानंतर खांद्यांवर किंवा कपड्यांवर पडतो. यामुळे महिलांसह पुरुषांनासुद्धा लाजिरवण्यासारखे वाटू लागते. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केसांना तेल लावू नये. यामुळे केस आणखीनच चिकट होतात आणि टाळूवर कोंडा वाढतो. टाळूवर कोंडा झाल्यानंतर सतत येणाऱ्या खाजेमुळे जखम होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास कोंडा कमी होऊन केस स्वच्छ होतील.
नैसर्गिक पदार्थांमध्ये असलेले गुणधर्म कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात. यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर करावा. अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले गुणधर्म केस स्वच्छ करून कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात. यासाठी वाटीमध्ये १ चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर घेऊन त्यात पाणी घालून मिक्स करा. तयार करून घेतलेले मिश्रण ब्रश किंवा बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावून घ्या. 10 मिनिटं ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. यामुळे केस सुंदर दिसू लागतील.
अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म केस मुळांपासून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यामुळे केसांची आणि मुळांची पीच पातळी संतुलित राहण्यास मदत होते. तसेच अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे टाळूवर किंवा केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होऊन जातो. याशिवाय कोंड्यामुळे केसांमध्ये वाढलेले बॅक्टरीया कमी करण्यासाठी या पदार्थाचा वापर करावा.