Malaika Arora नियमित न चुकता पिते 'या' पदार्थांपासून बनवलेला रस
सगळ्यांचं अभिनेत्रींप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ब्युटीमुळे कायमचं चर्चेत असते. तिची फॅशनची नाहीतर तिचा फिटनेस सुद्धा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. ती तिच्या सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही शेअर करत असते. योगासने, वर्कआउट्स आणि आरोग्यदायी खाण्याचे उपाय ती कायमच तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने तिने ती दिवसभर नेमकं काय काय खाते, याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आहे. सकाळी उठल्यानंतर ती ‘ABC ज्यूस’ घेते. आज आम्ही तुम्हाला ‘ABC ज्यूस’ म्हणजे काय? ‘ABC ज्यूस’ प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
किडनीला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच व्हा सावध होऊन घ्या काळजी
ABC ज्यूस म्हणजे A म्हणजे Apple (सफरचंद), Beetroot (बीट) आणि Carrot (गाजर). रोज सकाळी उठल्यानंतर मलायका अरोरा ABC ज्यूसचे सेवन करते. हा ज्यूस मलायका सकाळी उठल्यानंतर १० वाजता उपाशीपोटी पिते. हा रस तयार करताना त्यात थोडस आलं सुद्धा टाकावे. यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स, आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित ABC रसाचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर महिनाभर नियमित ABC ज्यूसचे सेवन केल्यास शरीरासह आरोग्याला अनेक फायदे होतात. या रसाचे सेवन केल्यामुळे केवळ आरोग्यच नाहीतर त्वचासुद्धाअतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. बीट आणि गाजरचे एकत्र मिश्रण तयार करून बनवलेला रस प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गाजरातील बीटा-कॅरोटीन डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. या रसात असलेल्या कमी कॅलरीजमुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे.
वारंवार पोटात दुखत? पावसाळ्यात उद्भवू शकते कावीळची समस्या, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
ABC ज्यूस बनवण्यासाठी सर्वप्रथम बीट, गाजर आणि सफरचंद स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यानंतर त्यात आल्याचा बारीक तुकडा आणि एक ग्लास पाणी घालून बारीक वाटून घ्या. तयार करून घेतलेले मिश्रण गाळून लगेच प्यावे. या रसाचे नियमित सेवन केल्यास महिनाभरात शरीरात अनेक बदल दिसून येतील.