फोटो सौजन्य - Social Media
जगदीशला एका हॉरर चित्रपटात मुख्य कॅमेरामनचे काम मिळाले होते. शूटिंग संपवून जगदीश अगदी शेवटच्या लोकलसाठी धावतपळत अंधेरी रेल्वे स्थानकावर आला. संपूर्ण रेल्वे स्थानक रिकामे होते. त्यावेळी अचानक एक लाल डोळ्यांचा तरुण त्याच्या शेजारी येऊन बाकावर बसला. त्याला पाहून अगदी कुणालाही धडकी भरेल असे त्याचे रूप! शेवटची लोकल आली. जगदीशसोबत तो माणूसही त्या ट्रेनमध्ये चढला आणि जगदीशच्या अगदी समोरच येऊन बसला.
सगळं काही सुरळीत सुरु होतं. जोगेश्वरी स्थानक जाताच तो माणूस पळत दरवाजाकडे धावू लागला आणि त्याने चालत्या लोकलखाली उडी मारली. त्याला पाहण्यासाठी जगदीशही दरवाजाकडे धावू लागला पण तिथे कुणीच पडले नव्हते. सगळं असं घडलं जसा तो एक केवळ भास होता. जगदीश घाबरून मागे वळला. मागे पाहतो तर काय? तो माणूस त्याच आधीच्या जागेवर स्तब्ध बसला होता. जगदीश घाबरून घामाने पूर्ण ओलाचिंब झाला.
जगदीश त्याच्या घरी पोहचला आणि सकाळी पुन्हा त्याच्या शूटिंगच्या ठिकाणी आला. तेव्हा त्याला दिग्दर्शकाच्या हातात एक फोटो दिसला. त्यात त्याच माणसाचा फोटो होता जो काळ जगदीशला लोकलमध्ये दिसला होता. जगदीशने दिग्दर्शकाला त्या माणसाची ओळख विचारले असता त्याला माहिती पडतं की तो माणूस कधीच मेला आहे.तो तिथेच स्पॉटबॉय म्हणून कामाला होता आणि अनेकांना तो लोकलमधून उडी मारताना दिसला आहे.






