उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी चेहऱ्यावर लावा डिंकाचा फेसपॅक
उन्हाळ्यात शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आरोग्यासह त्वचेवरसुद्धा लगेच दिसून येतो. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे संपूर्ण बॉडी डिहायड्रेट होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, मुरुम येणे किंवा इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पिंपल्स आल्यानंतर त्यांना सतत हात लावल्यामुळे किंवा कोणत्याही चुकीच्या क्रीमच्या वापरामुळे लहान पिंपल्स पुन्हा मोठे होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पिंपल्स किंवा मुरूम आल्यानंतर कोणत्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेचा रंग सुधारावा. यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण आणि चमकदार दिसू लागते.(फोटो सौजन्य – iStock)
रंग गोरा पण गुडघा काळा! काय असतं यामागचं कारण? घरगुती उपाय ठरतील प्रभावी
शरीरात उष्णता वाढल्यानंतर शरीराला थंडव्याची आवश्यकता असते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे उष्णता कमी होऊन पोटात थंडावा कायम टिकून राहतो. अशावेळी डिंकाचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरेल. डिंक शरीरात वाढलेली उष्णता कमी करून पोटात थंडावा कायम टिकवून ठेवतो. डिंकाचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी डिंकाचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
डिंकाचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये डिंक घेऊन त्यात गुलाबी पाणी टाकून भिजत ठेवा. रात्रभर डिंक भिजल्यानंतर व्यवस्थित डिंक भिजेल.वाटीमध्ये फुटलेले डिंक, मध घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर तसाच ठेवून घ्या. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. डिंकाचा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचेमधील उष्णता कमी होऊन चेहरा थंड राहील. याशिवाय मध चेहऱ्याचा रंग बदल्याण्यास मदत करेल. यामुळे त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी होऊन चेहरा उजळदार दिसू लागेल.
मागील बऱ्याच वर्षांपासून त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जात आहे. यासाठी वाटीमध्ये फुटलेलं डिंक घेऊन त्यात मुलतानी माती टाकून पेस्ट तयार करा. तयार करून घेतलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून २० मिनिटं तशीच ठेवून घ्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा.