घाणेरडे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी बाबा रामदेव यांचे उपाय (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढत आहे. भारतातील २५ ते ३० टक्के लोक कोलेस्ट्रॉलचे बळी आहेत. २५-३० वर्षे वयोगटातील लोकही कोलेस्ट्रॉलच्या विळख्यात आहेत. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे परंतु वाईट कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, हृदयविकार आणि स्ट्रोकसह अनेक गंभीर आणि जीवघेण्या समस्या निर्माण होतात. अनेक लोकांना आयुष्यभर कोलेस्टेरॉलसाठी औषधांवर अवलंबून राहावे लागते.
जर तुम्हाला नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलकमी करायचे असेल तर योगगुरू बाबा रामदेव यांनी एक प्रभावी उपाय सांगितला आहे. रामदेव यांनी सांगितले की जर कोलेस्टेरॉल वाढले तर जगातील कोणतेही औषध तुम्हाला हृदयविकारापासून वाचवू शकत नाही. जर तुम्ही आयुर्वेदिक उपाय वापरून पाहिले तर तुम्ही १०० वर्षांपर्यंत तुमचे हृदय निरोगी ठेवू शकता. रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, या वयातही त्यांना कधीही उच्च रक्तदाब, साखर, ताण आणि कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत नाही. हा उपाय करून पाहिल्याने शरीरात रक्त वाढण्यास आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
कोणते साहित्य वापरावे
काढ्यासाठी साहित्य
तयार करण्याची कृती
काढा बनविण्याची कृती
बाबा रामदेव यांनी व्हिडिओत सांगितले की, तुम्ही अर्जुनाची साल, दालचिनी आणि अर्जुन पावडरसह सर्व गोष्टी मिक्सर अथवा खलबत्त्यामध्ये घाला आणि चांगल्या प्रकारे बारीक करा. एका भांड्यात पाणी घाला आणि ते गरम करा आणि त्यात या गोष्टी चांगल्या प्रकारे उकळवा आणि एक काढा तयार करा.
बाबा रामदेव म्हणाले की, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून बनवलेला हा काढा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण उपायासारखा काम करतो. तुम्ही हा काढा दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी पिऊ शकता.
वितळू लागेल नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल, रोज सकाळी उठताच पाण्यात मिसळून प्या 3 मसाले
चहाऐवजी प्या काढा
काढा ठरेल रामबाण उपाय
आशिया खंडामधील लोकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण अनुवांशिकदृष्ट्या खूप जास्त आहे आणि जर तुम्हीही त्यापैकी असाल तर तुम्ही सकाळचा चहा सोडून द्यावा. जर तुम्ही चहाऐवजी हा आयुर्वेदिक काढा घेतला तर तुम्ही तुमचे हृदय निरोगी ठेवू शकता आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करू शकता असा सल्ला यावेळी रामदेव बाबा यांनी दिला आहे.
रामदेव म्हणाले की, जगभरात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधे केवळ कोलेस्टेरॉल कमी करत नाहीत तर शरीरालाही हानी पोहोचवत आहेत. या काढ्याचे सेवन केल्याने तुमचा रक्तदाबही नियंत्रित ठेवता येतो.
कोलेस्ट्रॉलसाठी काय खावे
कोणत्या पदार्थांचे सेवन करावे
रामदेव बाबा यावेळी म्हणाले की, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी तुम्ही बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर आणि खजूर यांसारखे सुके फळे आणि काजू खावेत. तसंच तेलकट पदार्थांचे सेवन करणे तुम्ही टाळायला हवे. बाबांच्या म्हणण्यानुसार शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अगदी साधे आण सोपे उपाय असून तुम्ही आपल्या सवयी बदलून शरीर निरोगी ठेऊ शकता.
बाबा रामदेव यांचा व्हिडिओ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.