(फोटो सौजन्य: Pinterest)
श्रवण महिना सुरु होणार आहे. भगवान शिवाला हा महिना फार प्रिय असल्याचे सांगितले जाते. हा महिना भगवान शिवाला समर्पित असून या महिन्यात शंकराची पूजा करून त्याच्या मूर्तीवर बेलपत्र अर्पण केले जाते. हिंदू धर्म आणि आयुर्वेदात बेलपत्राचे झाड खूप पवित्र मानले जाते. शिवपुराणानुसार, बेलपत्र भगवान शिवांना खूप प्रिय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? बेलपात्राला फक्त धार्मिक महत्त्वच प्राप्त नाही तर याचे आरोग्यालाही अनेक फायदे होत असतात. आताच्या बदलत्या जीवनशैलीत अनेकजण आरोग्याच्या आजारांनी त्रासलेले आहेत अशात बेलपत्राचे सेवन तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. असेही मानले जाते की देवी लक्ष्मी देखील बेलपत्रात राहते, म्हणून ते खूप शुभ आहे. चला याचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊया.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर
आचार्य चरक यांनी बेलपत्राचे असंख्य आरोग्य फायदे सांगितले आहेत. ते केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. बेलपत्राच्या पानांचा रस करून त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अतिसार आणि गॅस सारख्या समस्यांपासून मुक्तता होते. यात असलेले गुणधर्म आतड्यांना शांत करतात आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.
मधुमेहासाठी फायदेशीर
मधुमेह हा आजकाल एक सामान्य आजार बनला आहे यात रक्तातील साखर झपाट्याने वाढू लागते. ही साखर कमी करण्यासाठी लोकांना अनेक औषधं-गोळ्या खाव्या लागतात पण बेलपत्र एक असे औषधी पानं आहे ज्याच्या सेवनाने तुम्ही घरबसल्या तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात करू शकता आणि इन्सुलिनचे कार्य वाढवण्यास मदत करू शकतात. आयुर्वेदिक डॉक्टर टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांना त्याचा रस पिण्याची शिफारस करतात.
जळजळ आणि संसर्ग प्रतिबंध
बेलपत्रामध्ये बॅक्टेरिया, विषाणू आणि जळजळ यांच्याशी लढणारे घटक असतात. ताप आणि सौम्य संसर्गात याचे सेवन फायदेशीर आहे. याशिवाय, याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला सामान्य संसर्गांशी लढण्यास मदत होते.
बेलपत्राचे सेवन कसे करावे
यासाठी बेलपत्राची ताजी पाने घ्या आणि त्यांना बारीक करून त्याचा रस काढून घ्या. तयार रस एका ग्लासात काढा आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी १-२ चमचे याचे सेवन करा. तुम्ही ते पावडर स्वरूपात घेऊ शकता, यासाठी वाळलेली पाने बारीक करून पावडर बनवा आणि ते पाणी किंवा मधासह घ्या. बेलापत्र पाण्यात उकळून हर्बल टी बनवता येते, ते पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे.
चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! टोनर म्हणून वापरा ‘हे’ जादुई पाणी, त्वचा होईल देखणी
बेलपत्राचा मुख्य उपयोग काय?
बेलपत्राचा वापर धार्मिक कारणांसाठी केला जातो, विशेषतः हिंदू धर्मात पूजेसाठी, आणि पारंपारिक औषधांमध्ये पचन समस्या आणि मधुमेह यासारख्या विविध आजारांसाठी देखील केला जातो.
मी माझ्या आहारात बेलपत्र कसे समाविष्ट करू शकतो?
तुम्ही ते पावडर, रस किंवा पाककृतींमध्ये समाविष्ट करून विविध स्वरूपात घेऊ शकता, परंतु ते नियमितपणे तुमच्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिक किंवा जाणकार व्यावसायिकांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.