काजळ आणि सुरमा हे दोन्ही शब्द तुम्ही निश्चितच ऐकले असावेत. या दोन्हींचा वापर डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो. आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्याला एकप्रकारे आपल्याला आत्मविश्वास मिळवून देत असत आणि यात काजळ-सुरम्याची फार मदत होत असते. सुंदर दिसण्यासाठी विशेषतः महिला या सौंदर्य उपकरणाचा वापर करत असतात. अनेकदा लोक या दोन्हींमध्ये गोंधळताना दिसून येतात. या दोन्हीतील फरक विचारला की बहुतांश लोकांना याचे उत्तर ठाऊक नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सुरमा आणि काजळमध्ये नक्की काय फरक आहे ते सांगणार आहोत.
सुरमा हा एक पावडरसारखा दिसणारा पदार्थ आहे, ज्याचा वापर डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्याची केला जातो. सुरमा एक पारंपरिक ब्युटी प्रोडक्ट आहे. कोहिनूर नावाच्या दगडापासून सुरमा तयार केला जातो आणि सामान्यतः याचा रंग काळा असतो. याशिवाय सुरमा फक्त काळाच नाही तर पांढऱ्या रंगातही असतो. सुरमा वेगवगेळ्या प्रकारे बनवला जातो. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासह डोळ्यांच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो .उदाहरणार्थ, कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांसाठी सुरमा फायद्याचा असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे मायोपिया आणि मोतीबिंदूसारख्या रोगासाठीही सुरमा वापरला जातो.
हेदेखील वाचा – काळवंडलेला चेहरा गोरापान करण्यासाठी विटामिन ई चा वापर ‘या’ पद्धतीने करा, चेहऱ्यावर येईल चमक
काजळ हे एक उतपादन आहे जे कार्बन वापरून बनवले जाते. काजळ सुरम्यापेक्षा जाड असते. आता बाजारात अनेक प्रकारचे आणि वेगवेगळ्या कलरचे काजळ उपलब्ध आहेत. यामुळे डोळ्यांची कमी जळजळ होते. काजळची खास गोष्ट म्हणजे तुम्ही काजळ घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता.
हेदेखील वाचा – लादी पुसताना पाण्यात ही चमत्कारी गोष्ट टाका आणि कमाल पहा! पाली, झुरळ राहतील दूर