तांदळाच्या जेलचे त्वचेला होणारे फायदे
सर्वच महिला सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. काही महिला सतत पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करणे, क्लीनअप करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण सतत या गोष्टी केल्यामुळे कालांतराने त्वचा खराब होऊन जाते. त्वचेवर कमी वयात सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. त्यामुळे कोणतेही उपाय करताना त्वचेला सूट होतील की नाही याचा विचार करूनच मग करावे. हल्ली सोशल मीडियावर कोरियन स्किन केअर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. कोरियन प्रॉडक्टमध्ये तांदळाच्या पाण्याच्या वापर केला जातो. यामुळे त्वचा उजळदार आणि मऊ होण्यास मदत होते. त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी स्किन केअर करण्याऐवजी शरीराला आतून पोषण देणे फार गरजेचे आहे.
पूर्वी अनेक महिला केसांच्या वाढीसाठी आणि केस सिल्की ठेवण्यासाठी केसांना तांदळाचे पाणी लावत होत्या. मात्र हल्ली महिला तांदळाचे पाणी त्वचेला सुद्धा लावत आहेत. तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेवर केल्यास काळा पडलेला चेहरा उजळण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी तांदळाचे जेल कसे बनवायचे, याची सोपी कृती सांगणार आहोत. या घरगुती उपाय नियमित केल्यास त्वचा मऊ आणि तुकतुकीत होण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: सुंदर दिसण्यासाठी केसांना रंग करताय! मग जाणून घ्या केसांवर होणारे दुष्परिणाम
हे देखील वाचा: एका रात्रीत चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील नाहीशा, हा घरगुती पदार्थ करेल तुमची मदत