टॅनिंग घालवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा 'अशा' पद्धतीने करा वापर
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्रतेचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घरी असल्यानंतर चेहरा पूर्णपणे तेलकट आणि चिकट होऊन जातो. चेहऱ्यावर सगळीकडे तेल साचू लागते. तेलकट चेहरा वेळीच स्वच्छ केला नाहीतर संपूर्ण चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स येण्यास सुरुवात होते. हे पिंपल्स घालवण्यासाठी पुन्हा एकदा अनेक उपाय करावे लागतात. पण सध्या बाजारात कोरियन प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. या कोरियन प्रोडक्ट्सच्या मदतीने चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स घालवले जातात.
कोरियन प्रॉडक्ट बनवण्यासाठी वापरला जाणारा महत्वाचा पदार्थ म्हणजे तांदुळाचे पाणी. तांदुळाच्या पाण्याचा वापर करून कोरियन प्रॉडक्ट बनवले जातात. हे प्रॉडक्ट चेहऱ्यासाठी खूपच प्रभावी आहेत. कोरियन प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर करा. तांदुळाच्या पाण्यामध्ये असलेले एंटी एजिंग गुणधर्म त्वचेसाठी प्रभावी आहेत. तसेच यामुळे तुमची त्वचे डाग विरहित होण्यास मदत होते. डाग विरहित त्वचा मिळवण्यासाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी तांदुळाच्या पाण्याचा वापर करा. आज आम्ही तुम्हाला चमकदार त्वचेसाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: काकडीच नाही तर त्याच्या बियाही आहेत गुणांचे भांडार; जाणून घ्या फायदे
टॅनिंग घालवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा ‘अशा’ पद्धतीने करा वापर
तांदुळाच्या पाण्याचा वापर करण्याआधी एका वाटीमध्ये १ चमचा तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी टाकून अर्धा ते १ तास भिजण्यासाठी ठेवा. तांदूळ भिजल्यानंतर त्यातील पाणी बाजूला काढा. त्यानंतर टोपामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ आणि त्याचे पाणी घालून शिजण्यासाठी ठेवा. १५ मिनिटं शिजवून झाल्यानंतर हे पाणी थंड करून घ्या. त्यानंतर तुम्ही थंड झालेले पाणी त्वचेला लावू शकता.
हे देखील वाचा: पावसाळ्यात होणारे 5 सामान्य Eye Infection, अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत करा तपासणी
३ चमचे स्वच्छ धुवून घेतलेल्या तांदळामध्ये दीड ग्लास पाणी टाकून ३ दिवस तांदूळ भिजण्यासाठी ठेवा. ३ दिवसांनंतर तांदुळमधील पाणी वेगळे काढून घ्या. त्यानंतर कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर तांदुळाचे पाणी टाका. २० ते २५ मिनिटं ठेवून चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावर चमक येईल. टॅन झालेले चेहरा उजळण्यास मदत होईल.
टॅनिंग घालवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा ‘अशा’ पद्धतीने करा वापर
तांदुळाच्या पाण्यापासून टोनर तयार करण्यासाठी १ बॉटल तांदुळाच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. हे पाणी टोनर म्हणून चेहऱ्यावर वापरा. काही दिवसांमध्ये त्वचा उजळण्यास मदत होईल. हे टोनर चेहऱ्याला लावून १० मिनिटं ठेवून द्या.चेहरा कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.