त्वचेवर फेशिअल ऑइल वापरण्याचे फायदे
सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. वाढत्या वयानुसार त्वचेमध्ये हळूहळू बदल होण्यास सुरुवात होते. त्वचेमध्ये सुरकुत्या येणे, वांग येणे, त्वचेचा रंग बदलणे, त्वचा अधिक कोरडी दिसणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला तरुण दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम्स, सीरम, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. त्वचा ग्लोइंग आणि उजळदार दिसण्यासाठी त्वचेची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. याशिवाय कोणालाही त्वचेचा प्रकार बदलता येत नाही मात्र तुम्ही घरगुती उपाय करून त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारू शकता. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्वचेला आतून पोषण देणे सुद्धा आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
झोपतेतून उठल्यानंतर चेहरा काळवंडलेला दिसतो? मग अंघोळीआधी चेहऱ्यावर लावा ‘हे’ जादुई पदार्थ
वाढत्या वयात त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. मात्र समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य ते उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. त्वचा ग्लोइंग आणि उजळदार दिसण्यासाठी हल्ली बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फेशिअल ऑइल उपलब्ध झाले आहेत. फेशिअल ऑइल चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचेवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय तेलकट त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे चेहऱ्यावर अधिक पिंपल्स येण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरातून दोनदा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवणे आवश्यक आहे.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि केसांसाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जात आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. या तेलाचा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचेमधील कोरडेपणा कमी होऊन त्वचा मऊ आणि मुलायम दिसते. खोबऱ्याच्या तेलाचा वापर मेकअप काढण्यासाठी सुद्धा केला जातो. खोबऱ्याचे तेल त्वचेवर लावल्यामुळे जळजळ आणि सूज कमी होते. या तेलामध्ये असलेले लॉरिक ऍसिड खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी मदत करते.
बदाम खाणे आरोग्यासाठी जसे फायदेशीर आहे, तसेच बदामाचे तेल सुद्धा त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. बदाम तेलाचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. बदामाच्या तेलात विटामिन इ, के इत्यादी अनेक घटक आढळून येतात. डार्क सर्कल्स, डाग, बारीक खुणा इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बदाम तेलाचा वापर करावा.
त्वचेमध्ये होणारी जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठी जोजोबा तेलाचा वापर करावा. यासाठी हातावर तेल घेऊन बोटांच्या सहाय्याने हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळाने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा शांत होईल.एक्झिमा, सोरायसिस इत्यादी समस्या कमी करण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो.