बहुतेक घरांमध्ये उंदरांची दहशत पाहायला मिळते. या घरातील उंदरांच्या दहशतीमुळे अनेकलोक हैराण झाले आहेत. कारण एकदा का हे उंदीर घरात आले की बाहेर जाण्याचे नाव घेत नाहीत. त्यांचा हा घरातील वावर अनेक आजरांना आमंत्रण देऊ शकतो त्यामुळे यांना वेळीच घराबाहेर काढणे कधीही सोयीचे ठरते. घरातील उंदरांना बाहेर काढणे तसे अवघडच काम आहे मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही गाडी सहज आणि काहीही विशेष करता या उंदरांना घराबाहेर काढू शकता.
उंदरांच्या संचार घरात नवनवीन आजरांना जन्म देत असतो. शिवाय अनेकदा ते अनेकदा घरातील तारा, कपडे, बूट चावून लोकांच्या समस्या वाढवतानाही दिसत असतात. अशात या उंदरांना लवकरात लवकर घराबाहेर काढणे हा एकाच उत्तम उपाय ठरू शकतो. घरातील उंदरांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही उपायांचा वापर करू शकता.
हेदेखील वाचा – विकत आणायची गरज नाही, या टिप्स फॉलो करून घरीच तयार करा घट्ट दही
कांद्याच्या वासाने घरातील उंदीर पळू लागतात. याचा उग्र वास त्यांना आवडत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कांदा कापून घराच्या एका कोपऱ्यात ठेवू शकता. मात्र, कांदा लवकर सुकतो. त्यामुळे दर 2-3 दिवसांनी कांदा बदलत राहा. या उपायाच्या मदतीने तुम्ही घरातील उंदीरं पळवून लावू शकता.
पीनट बटर हे माणसांनाच नाही तर उदरांनाही फार आवडते. याचा सुगंध त्यांना जवळ यायला भाग पाडत असतात. आता याच पीनट बटरचा वापर करून तुम्ही एक सापळा रचू शकता. जर तुम्हाला उंदीर पकडायचे असतील तर कोणत्याही ब्रेडवर पीनट बटर लावा आणि सापळा लावा. यामुळे उंदीर पकडला जाईल आणि तुम्हाला त्याला घराबाहेर काढता येईल.
हेदेखील वाचा – भिंतीवरील काळे डाग घराचा लूक खराब करतायेत? या घरगुती पदार्थांचा वापर करून क्षणार्धात दूर करा हट्टी डाग
घरातील उंदीर दूर करण्यासाठी लाल मिरची एक प्रभावी उपाय ठरू शकतो. उंदरांना न मारता घरातून हाकलण्यासाठी तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता. यासाठी ज्या ठिकाणी अधिकतर उंदीर दिसतात त्या ठिकाणी तिखट किंवा सुकी तिखट ठेवा. यामुळे उंदीर घरातून पळून जातील.
आम्ही तुम्हाला सांगतो की, उंदरांना पुदिन्याचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे उंदीर घराबाहेर घालवण्यासाठी तुम्ही पेपरमेंट तेलाचा करू शकता. यासाठी कापसावर पेपरमेंट तेल टाकून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा. असे केल्याने, घरातील उंदीर बाहेर पडतील. तसेच पेपरमिंट ऑइल तुमच्या घरासाठी रूम फ्रेशनर म्हणूनही काम करेल.