सकाळचा नाश्ता आपल्या निरोगी आरोग्यासाठी फार महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावत असतो. सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नये, हा आपल्याला दिवसभर एनर्जी देण्यास मदत करत असतो. बाहेरच्या अन्नपदार्थांमुळे अनेकांनी आपल्या हेल्थ खराब करून घेतली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे या वयातही फिट आहेत, त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा उत्कृष्ट आहार.
तुम्हालाही जर फिट राहायचे असेल आणि लठ्ठपणाच्या समस्येपासून दूर राहायचे असेल तर मोदींची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मोदींनी या आधीही आपल्या आहाराबाबत अनेकदा भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी नाश्त्याची एक रेसिपी सर्वांसोबत शेअर केली आहे. आम्ही ज्या रेसिपीविषयी बोलत आहोत त्या रेसिपीचे नाव आहे नाचणी डोसा. हा डोसा चवीबरोबरच आरोग्यासाठीही फार फायद्याचा ठरतो. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.