सध्या धकाधकीचे जीवन, जीवघेण्या स्पर्धेतून जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. यामुळे मुलींच्या लग्नाला होणारा विलंब, पर्यायाने गरंभधारणेस उशीर. त्यात स्तनपान न करण्याची भावनाही बळावलेली. तसेच आनुवंशिकता यामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका प्रचंड वाढला आहे. मेडिकलच्या कॅन्सरच्या 2 हजार 300 रुग्णांची नोंद झाली. यापैकी तब्बल 690 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) झाल्याचे धक्कादायक निदान पुढे आले.
उर्वरित 20 टक्के म्हणजे 460 महिला या तिशीनंतरच्या आहेत. ब्रेस्ट कॅन्सरसाठी वय, कॅन्सरचा पूर्वेतिहास, परिवारात कुणास असेल वा आनुवंशिकता, किरणतोत्सार प्रादुर्भाव, लठ्ठपणा, लवकर पाळी येणे, उशिरा रजोनिवृत्ती, उशिरा गर्भधारणा होणे, स्तनपान न करणे, रजोनिवृत्तीनंतरची हॉर्मोनल थेरपी, मद्यपान या बाबी कारणीभूत असतात. वयाच्या 35 नंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी केली पाहिजे. कॅन्सरची जोखीम असेल तर वयाच्या पंचेविशीनंतर मॅमोग्राफी करणे हितावह आहे. असे रेडिओथेरपी विभाग प्रमुख डॉ. अशोक कुमार दिवाण यांनी सांगितले.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे
ब्रेस्ट कॅन्सर टाण्यासाठी