केमिकलयुक्त Protein powder विकत आणण्यापेक्षा घरीच 'या' पद्धतीने बनवा प्रोटीन पावडर
लहान मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी काहींना काही उपाय सतत केले जातात. कधी ड्रायफ्रूट खाण्यास दिले जतात या तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रोटीन पावडरचे सेवन करण्यास दिले जातात. वय वाढल्यानंतर मुलांच्या शारीरिक विकासावर जास्त भर दिला जातो. वयाच्या 1 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंत मुलांची उंची, वजन आणि शरीरात सतत काहींना काही बदल होतात. पण अनेकदा मुलांचा योग्य पद्धतीने शारीरिक विकास न झाल्यामुळे त्यांना सकाळच्या वेळी किंवा रात्री झोपताना वेगवेगळ्या प्रोटीन पावडरचे सेवन करण्यास दिले जाते. पण बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रोटीन पावडरमध्ये केमिकल पदार्थांचा वापर केला जातो. हे केमिकल पदार्थ आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आणि घातक ठरतात. त्यामुळे लहान मुलांचे कमी झालेली वजन पुन्हा वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून प्रोटीन पावडर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या प्रोटीन पावडरचे सेवन केल्यामुळे शरीराचा योग्य तो विकास होईल आणि हाडांनासुद्धा अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)
Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा नूडल्स सॅलडचे सेवन, पोट होईल झपाट्याने कमी
हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा Mixed vegetable soup, नोट करा रेसिपी