वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे?
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक आणि शरीरास पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू शरीराचे रक्तभिसरण कमी होऊन आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहिल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात अति तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थाचे पाणी प्यावे, याबद्दल सांगणार आहोत. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
आल्याचे पाणी बनवण्यासाठी आलं स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर भांड्यात पाणी घेऊन त्यात आल्याचे तुकडे टाकून मिक्स करा. रात्रभर पाणी तसेच ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पाणी उकळवून प्या. यामुळे शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राण्यास मदत होईल. तसेच तुम्ही आल्याच्या पाण्यात लिंबू पिळून सुद्धा पिऊ शकता.यामुळे हृदयाच्या नसांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
थंडीच्या दिवसांमध्ये तापमान कमी झाल्यामुळे साथीच्याया आजारांमध्ये वाढ होऊ लागते. हे आजार वाढल्यानंतर आरोग्याचे नुकसान होऊ लागते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर शरीर कमकुवत होऊन जाते. अशावेळी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. थंडीमध्ये आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यास पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीरसंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागत नाही.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सांधे दुखीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होऊन सांधे दुखीपासून आराम मिळतो. आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. शिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे.