मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी घरी बनवा बीटरूटचे खास ड्रिंक!
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी सर्वच महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले फेसपॅक लावले जातात तर कधी फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. मात्र काहीवेळा हे उपाय करून त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भरपूर वेळ लागतो. त्यामुळे त्वचेला सूट न होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करू नये. सुंदर आणि चमकदार त्वचेला आतून पोषण देणे आवश्यक आहे. यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आहारात फळे, पालेभाज्या, दही, ताक इत्यादी थंड आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास आतून स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर आलेले सर्व डाग कायमचे निघून जातील. म्हणूनच आज आम्ही सुंदर आणि मऊ त्वचेसाठी बीटरूटचा हेल्दी ज्युस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)