रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. दैनंदिन आहारात पोषक घटकांचे सेवन न केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. लहान मुलांसह मोठ्यांमध्ये एनिमियाची समस्या वाढत चालली आहे. यामध्ये लहान मुलं आणि महिलांची आकडेवारी अधिक आहे. 6 ते 59 वर्ष वयोगटातील तरूण मुलं, मुली एनिमिया या गंभीर आजारामुळे त्रस्त आहेत. ही समस्या प्रामुख्याने मासिक पाळीच्या दिवसांमध्ये उद्भवू लागते. शरीरामध्ये एनिमियाची कमतरता निर्माण होण्यामागे अनेक कारण आहेत. शरीरात निर्माण झालेली आयर्नची कमतरता, हिमोग्लोबिन तयार न होणं, योग्य आहार न घेणं, पचनक्रिया सुरळीत नसणं, व्हिटामीन बी-12 , फॉलिक एसिडची कमतरता, गंभीर जखम, सर्जरी किंवा क्रोनिक आजार इत्यादी अनेक गोष्टींमुळे एनिमिया होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
ईशा फाऊंडेशनचे फाऊंडर आणि भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी यावर सोपे उपाय सांगितले आहेत. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत थकवा, अशक्तपणा, मानसिक तणाव, सतत आजारी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेले काही सोपे उपाय सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया.
रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात मूठभर नट्सचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही चणे, शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड इत्यादी सुक्या मेव्याचे सेवन करू शकता. नट्समध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन ई आढळून येते. याशिवाय रेड ब्लड सेल्स चांगल्या राहण्यासाठी मदत होते. एनिमियाने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित नट्सचे सेवन करावे. यामुळे शरीरात वाढलेली रक्ताची कमतरता भरून निघेल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी मोड आलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. कडधान्य, डाळीचे सेवन केल्यामुळे हिमोग्लोबीन आणि लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते. स्प्राऊट्स नॉन हिम हा आयर्नचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे नियमित सकाळच्या नाश्त्यात मोड आलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
ब्रेकफास्ट सिरियल्स हा पदार्थ एनिमिया नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतो. यामध्ये आयर्न, फॉलेट आणि विटामिन बी-१२ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या पदार्थाचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबीन आणि रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. निरोगी आरोग्यासाठी या पदार्थाचे नियमित तुम्ही सेवन करू शकता.