किडनीमध्ये साचून राहिलेले मुतखडे बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' ड्रिंकचे नियमित करा सेवन
धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गंभीर आजारांची लागण होत आहे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर आणि किडनीसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत.किडनी स्टोन झाल्यानंतर ओटीपोटात वेदना होणे, पोटात दुखणे, लघवी करताना जळजळ, पाठ दुखणे, अचानक पोटदुखी, श्वास घेण्यात त्रास, शरीरात थकवा इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात. हल्ली किडनी स्टोनची समस्या वाढू लागली आहे. अशावेळी मेडिकलमधील पेनकिलर गोळ्यांचे सेवन केले जाते. पण पेनकिलरच्या गोळ्या वारंवार खाल्ल्यामुळे किडनी निकामी होते. आज आम्ही तुम्हाला किडनीमध्ये साचून राहिलेले खड्डे बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या ड्रिंकचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या ड्रिंकचे नियमित सेवन केल्यास किडनीमधील विषारी घटक बाहेर पडून जातील.(फोटो सौजन्य – istock)
शरीर कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. किडनीमधील स्टोन विरघळवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. यामुळे लघवीवाटे किडनी स्टोन बाहेर पडून जातो. तसेच मिनरल्स विरघळतात आणि स्टोन कमी होतो.
विटामिन सी युक्त लिंबाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते. किडनीतील मिनरल्स आणि क्षार बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. लिंबू सरबत नियमित प्यायल्यास किडनीमधील स्टोन विरघळून जाईल.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे किंवा डाळिंबाचे दाणे खावेत. डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स लघवीमधील क्रिस्टल्स कमी करून टाकतात. याशिवाय नव्याने स्टोन होऊ नये म्हणून शरीराचा बचाव करतात. वारंवार पोटात वेदना होत असतील तर सकाळी उठून नियमित डाळिंबाच्या दाण्यांचा रस प्यावा. याशिवाय डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारते.
किडनी स्टोन म्हणजे काय?
किडनी स्टोन, ज्याला मुतखडा किंवा मूतखडा असेही म्हणतात, हे मूत्रपिंडात तयार होणारे स्पटीकयुक्त कण आहेत. जेव्हा लघवीमध्ये खनिजे आणि लवणांचे प्रमाण जास्त होते आणि द्रवपदार्थ कमी असतात, तेव्हा हे कण एकत्र येऊन कठीण दगड तयार करतात.
किडनी स्टोनची लक्षणे कोणती?
पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात तीव्र वेदना.लघवीतून रक्त येणे.मळमळणे आणि उलट्या होणे.ताप आणि थंडी वाजून येणे
किडनी स्टोनची कारणे काय आहेत?
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात सोडियम (मीठ) आणि प्राण्यांच्या प्रथिनांचे सेवन करणे. काही प्रकरणांमध्ये, जास्त ऑक्सलेट असलेल्या पदार्थांचे सेवन करणे.