हार्ट अटॅकच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, सतत जंक फूडचे सेवन, कामाचा तणाव, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृद्य संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा आणि पोषक तत्व पुरवण्याचे काम करते. मात्र हृदयाच्या कार्यात थोडासा ही बदल झाल्यास संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. शरीरात व्यायामाचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे हृदयाचे कार्य बिघडते. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाला हानी पोहचण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांमध्ये चिटकून राहिलेला पिवळा थर रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
सोनू निगमला होतोय पाठदुखीचा त्रास! स्नायूंमध्ये क्रॅम्प आल्यास नक्की करा ‘हे’ घरगुती उपाय
हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पौष्टिक पदार्थांच्या सेवनामुळे शरीर निरोगी राहते. आज आम्ही तुम्हाला हृदयाचे कार्य निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हृदयासाठी हे पदार्थ अतिशय फायदेशीर आहेत.
दैनंदिन आहारात नियमित अक्रोडचे सेवन करावे. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या पदार्थाचे सेवन केल्यामुळे हृदयाचे कार्य निरोगी राहते. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित १ किंवा २ अक्रोडचे सेवन करावे. यामुळे वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. अक्रोड खाल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
हृदय आणि मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी दैनंदिन आहारात सकाळी उठल्यानंतर नियमित 4 किंवा 5 बदामाचे सेवन करावे. बदाम खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, विटामिन ई आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक आढळून येतात. यामध्ये असलेले चांगले फॅट्स वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच बदाम खाल्यामुळे शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहते.
वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बेरीजचे सेवन करावे. आहारात तुम्ही ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, आणि ब्लॅकबेरी इत्यादी बेरीजचे सेवन करू शकता. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात. याशिवाय या फळांचे सेवनामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊन आरोग्य सुधारते. शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बेरीजचे सेवन करावे.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ आंबट गोड फळाचे सेवन,आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फायबर, प्रोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्या मिळतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्या मजबूत होतात. पालक, मुळा, मेथी, लाल माठ इत्यादी भाज्यांचे सेवन तुम्ही रोजच्या आहारात करू शकता.