दिवाळीत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)
दिवाळी हा प्रकाशाचा, दिव्यांचा आणि फटाक्याचा सण असतो. दिवाळीत सगळ्याच वयोगटातील व्यक्तींना फटाके फोडायला आवडत असले तरी फटाक्यांमुळे विशेषतः डोळ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. दर वर्षी अनेकांच्या डोळ्यांना इजा होते. फटाक्यांमुळे इजा होणाऱ्या अवयवांमध्ये हात आणि बोटांखालोखाल डोळ्यांचा नंबर लागतो.
फटाक्यांमुळे निर्माण होणारा धोका हा फक्त फटाके फोडणाऱ्यांपर्यंतच मर्यादित नसून यापैकी निम्मी प्रकरणे ही फक्त फटाके फुटण्याच्या ठिकाणी उभे असलेल्या व्यक्तींची असतात. म्हणून या संदर्भातील जागरुकता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. डॉ. वंदना जैन, चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर, डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल यांनी महत्त्वाचे उपाय आणि काळजी कशी घ्यावी सांगितली आहे.
फटाक्यांचा डोळ्यांवर कशा प्रकार परिणाम होतो
डोळ्यांना होणारी प्रमुख इजा
डोळ्यांची कमी झालेली नजर होईल तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कायमचा घालवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ
कसे करावे उपाय?
डोळ्यांना वरवर जखम झाली असेल तर अशा रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात येतात. पण डोळ्याच्या पडद्याला चीर गेली असेल तर काळजीपूर्वक उपचार करावे लागतात. अनेक प्रकरणांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यात डोळ्याच्या पारपटलाला (कॉर्निअल टिअर) किंवा श्वेतपटलाला चीर जाणे, याचा समावेश होतो. आघातामुळे काही वेळा डोळ्यातील बाहुली तिच्या मूळ स्थानापासून वेगळी होणे (इरिडोडायलिसिस), डोळ्याच्या पुढील भागात रक्तस्राव होणे (हायफिमा), डोळ्याच्या आत बाहेरील वस्तू (आयओएफबी) असल्याचा संशय निर्माण होणे किंवा डोळ्याचे बाह्य पटल फाटणे (ग्लोब रप्चर) अशी गुंतागुंत उद्भवू शकते. अशा प्रकरणांमध्ये पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल होणे आवश्यक ठरते.
सुरक्षिततेसाठी पुढील काळजी घ्यावी
काय करू नये