मधुमेह झालेल्या रुग्णांनी 'या' फळांचे सेवन करावे
मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर मधुमेह होतो. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसू लागणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. मधुमेह झाल्यानंतर कमीत कमी गोड पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आहारात अनेक पथ्य पाळावी लागतात. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांचे सेवन करताना मोजक्याचं फळांचे सेवन करावे. कारण फळांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अति गोड पदार्थ खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सफरचंदाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. डॉक्टर नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे कोणत्याही आजाराची लागण होत नाही. तसेच यामध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित एक सफरचंद खावे. हे फळ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेहांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी नियमित एक सफरचंद खावे. सफरचंद खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं संत्री खूप आवडतात. संत्री खाल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी संत्र हे फळ अतिशय योग्य आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी संत्र्याचे सेवन करावे. संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.
किवी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या फळात फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. तसेच यामध्ये विटामिन सी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारते. मधुमेह झालेल्या रुग्णांनी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा किवीचे सेवन करावे.
चवीला आंबट गोड असलेल्या बेरीज सगळ्यांना खूप आवडतात. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, आणि रास्पबेरी या फळांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते. शिवाय यामध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. फायबरचे प्रमाण जास्त असलेल्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आहारात तुम्ही बेरीज खाऊ शकता.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
पपईमध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपई सुरक्षित आहे. पपई रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. पपईचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.






