(फोटो सौजन्य: Pinterest)
हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांना मानले जाते, त्यांची बरीच मंदिरेही देशात प्रचलित आहेत. भारतात धार्मिक पर्यटनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोक दूरदूरवरून या धार्मिक ठिकाणांना भेट द्यायला जातात. प्रत्येक ठिकाणाची वेगळी खासियत असते आणि इथे मनोभावनेने पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते. त्यातच आता आज आम्ही तुम्हाला देशातील अशा अनोख्या मंदिराविषयी माहिती सांगणार आहोत ज्याचे नाव तुम्ही आजवर ऐकले नसेल. हे मंदिर फार प्राचीन असून याविषयी अनेकांना फारशी माहिती नाही.
Monsoon Travel: राजस्थानच्या या ठिकाणी वाळवंट दिसणार नाही, बेट आणि पर्वतांवर घेऊ शकता सुट्टीचा आनंद
आम्ही तुम्हाला ज्या मंदिराविषयी सांगत आहोत त्याचे नाव ‘सास-बहू’ असे आहे. मंदिराचे नाव ऐकताच अनेकजण याला सासू-सुनेच्या नात्याशी अथवा सासू-सुनेच्या कुठेही जोडू पाहतील मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, या मंदिरात असे काहीच नाही, इथे देवीची पूजाही केली जात नाही मग या मंदिराला असे नाव का पडले असावे? चला प्रथम या मंदिराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सास-बहू मंदिर कुठे आहे?
सास-बहू हे मंदिर भारताच्या राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यात आहे. हे मंदिर जयपूरपासून १५० किमी आणि उदयपूरपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या लहान नागदा गावात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या मंदिराचा इतिहास १०० वर्षांहून अधिक जुना आहे. १० व्या शतकात या मंदिराची स्थापना करण्यात आली, त्याची वास्तुकला मध्ययुगीन भारतीय शैलीत आहे. मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा कोरलेल्या आहेत. मंदिर जंगले, पर्वत आणि हिरवळीने वेढलेले आहे. येथील शांत वातावरण आणि कलात्मक कोरीवकाम पर्यटकांना आकर्षित करते.
याला सास-बाहू मंदिर का म्हणतात?
खरं तर, मंदिराचे नाव सहस्त्रबाहू मंदिर आहे. हे मंदिर हजारो हात असलेल्या भगवान विष्णूला समर्पित आहे. अनेकदा लोक सहस्त्रबाहू मंदिराचे नाव उच्चारू शकत नव्हते. चुकीच्या उच्चारामुळे लोक सहस्त्रबाहूला सास-बाहू म्हणत असत. त्यांनतर कालांतराने या ठिकाणाला सास-बहू हे नाव पडलं, आजही हे मंदिर या नावानेच प्रचलित आहे मात्र याचा सासू-सुनेशी काहीही संबंध नाही.
जगातील सर्वात लहान फ्लाइट, प्रवाशांना अवघ्या 53 सेकंदातच गंतव्यस्थापर्यंत पोहचवते…
या संकुलात दोन मंदिरे आहेत
कच्छवाह राजवंशातील राजा महिपालची पत्नी भगवान विष्णूची उत्कट भक्त होती. तिच्यासाठी राजाने विष्णूजींचे एक सुंदर मंदिर बांधले, ज्याचे नाव सहस्त्रबाहू असे ठेवण्यात आले. जेव्हा राजाच्या मुलाचे लग्न झाले तेव्हा सून शिवभक्त होती. सुनेची श्रद्धा मानून राजाने त्याच मंदिर संकुलात भगवान शिवाला समर्पित एक मंदिर बांधले. अशाप्रकारे आता इथे एकाच ठिकाणी दोन मंदिरं आहेत. इथे जाताच शांततामय वातावरण आणि हिरवळीचे अनोखे दृश्य पाहता येते त्यामुळे धार्मिक पर्यटन करायला आवडत असेल तर एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्या.