(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि तेथील ऐतिहासिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध आहेत. अनेक पर्यटक दूरदूरवरून भारतातील या सुंदर ठिकाणांना भेट देण्यासाठी येथे येत असतात. भारतात अनेक राज्य आहेत, प्रत्येक राज्यात वेगळी लोकप्रिय ठिकाणे, वेगळी परंपरा आणि अनोखा इतिहास पाहायला मिळतो. भारतातील असेच एक सुप्रसिद्ध राज्य म्हणजे राजस्थान!
आलिशान महाल आणि वाळवंटाने व्यापलेले हे राज्य तेथील ऐतिहासिक वारसासाठी आणि परंपरेसाठी ओळखला जातो. येथील ७०% भूभाग वाळवंटाने व्यापलेला आहे आणि म्हणूनच राजस्थानला “भारताचे वाळवंट राज्य” असे म्हटले जाते. राजस्थान म्हटलं की प्रत्येकाला वाळवंट आठवू लागतो मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, येथे अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे तुम्ही वाळवंट नाही तर हिरवीगार सुंदर दृश्य पाहू शकता. यंदाच्या मान्सूनमध्ये जर तुम्ही राजस्थानला भेट देण्याचा विचार केला असेल तर ही ठिकाणे तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवीत.
जगातील सर्वात लहान फ्लाइट, प्रवाशांना अवघ्या 53 सेकंदातच गंतव्यस्थापर्यंत पोहचवते…
माउंट आबू
राजस्थानमध्ये तसे हिल स्टेशन नाही मात्र माउंट आबू हे येथील एकमेव हिल स्टेशन आहे, जे समुद्रसपाटीपासून १,२२० मीटर उंचीवर आहे. इथे तुम्हाला हिरवेगार टेकड्यांचे दृश्य पाहायला मिळेल. पाइनची जंगले, थंड वारा आणि सुंदर ढग यामुळे इथे परदेशात आल्याचा भास होऊ लागतो. हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला वाळवंटाचे नमो निशाण सापडणार नाहीत. इथे बोटिंग करण्याचीही सुविधा आहे, कुटुंबासोबत इथे एक चांगला वेळ घालवता येऊ शकतो.
उदयपूर
उदयपूर हे राजस्थानमधील एक लोकप्रिय ठिकाण आहे, हे ठिकाण तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. अधिकतर लोक आपल्या लग्नाचे प्री-वेडिंग शूट करण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. इथे अनेक आलिशान राजवाडे पाहायला मिळतात. पिछोला तलावाच्या काठावर अनेक राजवाडे आहेत जे तुम्हाला राजासारखे वाटतील. तुम्ही येथे चांगली सुट्टी घालवू शकता. इथेही तुम्हाला दूरदूरवर वाळवंट अजिबात दिसणार नाही.
बांसवाडा
जर तुम्हाला राजस्थानला भेट द्यायची असेल आणि वाळवंटाऐवजी बेट पहायचे असेल तर राजस्थानमधील बांसवाडा नावाचे एक शहर तुमच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. पर्यटकांमध्ये या ठिकाणाची सध्या फार क्रेझ आहे. खरंतर इथे माही नदी आहे, ज्यामध्ये सुमारे १०० सुंदर लहान बेटे आहेत. पाण्याने वेढलेली ही बेटे पाहण्यास खूप सुंदर आहेत. दूरदूरचे लोक आता येथे भेट देण्यासाठी येत आहेत.