ता: 30 -7 – 2023, शनिवार
तिथी: द्वादशी
मिती: राष्ट्रीय मिति 8, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, श्रावण शुक्ल पक्ष द्वादशी 10:34, नंतर त्रयोदशी
सूर्योदयकालीन नक्षत्र: मूल 21:32, योग – ऐन्द्र 6:32, नंतर वैधृति 27:00, करण- बालव 10:34, नंतर कौलव 21:04, पश्चात तैतिल
सूर्योदय: 5:58, सूर्यास्त: 6:59
शुभ अंक: 1, 2, 6
शुभ रत्न: सूर्यासाठी माणिक
शुभ रंग: सोनेरी आणि पिवळा
दिनविशेष
30 जुलै घटना
762: बगदाद शहराची खलिफा अल मन्सूर यांनी स्थापना केली.
2014: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून पन्नास लोकांचे निधन.
2001: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
2000: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
1971: अपोलो 15 हे अंतराळयान चंद्रावर उतरले.
1962: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे 8,030 किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
1930: फुटबॉल विश्वचषक – उरुग्वे देशाने पहिला फुटबॉल विश्वचषक जिंकला.
1898: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
1629: इटली – देशातील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे दहा हजार लोकांचे निधन.
30 जुलै जन्म
1980: जेम्स अँडरसन – इंग्लिश क्रिकेट खेळाडू
1973: सोनू निगम – पार्श्वगायक
1962: याकूब मेमन – भारतीय दहशतवादी
1951: गॅरी यहूदा – भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार
1947: अर्नोल्ड श्वार्झनेगर – ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू आणि अभिनेते
1863: हेन्री फोर्ड – फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक
1855: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती
1818: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका
30 जुलै निधन
2017: अँटोन व्रतुसा – स्लोव्हेनिया देशाचे पंतप्रधान
2013: बेंजामिन वॉकर – भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार
2011: डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक
2007: मिकेलांजेलो अँतोनियोनी – इटालियन चित्रपट दिग्दर्शक
2007: इंगमार बर्गमन – स्विडिश चित्रपट दिग्दर्शक
1998: भारतन – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक
1997: राजा बाओडाई – व्हिएतनामचा
1995: वि. म. दांडेकर – अर्थतज्ञ
1994: शंकर पाटील – साहित्यिक, कथालेखक
1992: जो शस्टर – सुपरमॅन हिरोचे सहनिर्माते
1983: वसंतराव देशपांडे – शास्त्रीय नाट्यसंगीत गायक
1962: याकूब मेमन – भारतीय दहशतवादी
1960: गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक
1947: जोसेफ कूक – ऑस्ट्रेलियाचे 6वे पंतप्रधान