सतत दारू पिऊन सडलेलले लिव्हर पुन्हा एकदा होईल स्वच्छ! रोजच्या आहारात नियमित करा 'या' जादुई पदार्थांचा समावेश
लिव्हर खराब होण्याची कारणे?
लिव्हर खराब झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी काय खावे?
शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. खाल्लेले अन्नपदार्थ पचन करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे इत्यादी ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. पण बऱ्याचदा जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, पाण्याचे कमी सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लिव्हरच्या आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच आरोग्याची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. लिव्हर खराब होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. वारंवार दारूचे सेवन करणे, सिगारेट , बिअर इत्यादी मद्याचे सेवन केल्यामुळे लिव्हर आतून पूर्णपणे खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हर खराब झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीराची पचनक्रिया बिघडणे, विषारी घटक बाहेर पडून न जाणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे लिव्हर कायमच निरोगी असणे फार महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला दारू पिऊन सडलेले लिव्हर एकदा स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते.
सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात. यामध्ये असलेले निरोगी फॅट्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स लिव्हरमध्ये वाढलेली जळजळ कमी होते. यकृताच्या पेशींचे संरक्षण करण्यासाठी रोज बदाम, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ कमी करतात. अक्रोडमध्ये दाहक विरोधी आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड युक्त घटक आढळून येतात. लिव्हरवर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अक्रोड खावेत. सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले ४ ते ५ बदाम खावेत. यामध्ये असलेली विटामिन ई, फायबर आणि निरोगी चरबी लिव्हरसाठी फायदेशीर ठरते.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले घटक लिव्हरमध्ये जमा झालेली विषारी घाण बाहेर काढून टाकतात. हळदीमध्ये ‘कर्क्युमिन’ असते, ज्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते. यासोबतच हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे कुजलेले लिव्हर स्वच्छ होते. तसेच रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हळद मिक्स करून प्यायल्यास महिनाभरात लिव्हर स्वच्छ होईल आणि तुम्ही कायमच हेल्दी राहाल.
लिंबामध्ये विटामिन सी, सायट्रिक ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेल्या घाणेरड्या पेशी बाहेर पडून जातात आणि शरीर आतून स्वच्छ होते. लिव्हरची कार्यक्षमता सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यावा. यामुळे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाते.
Ans: त्वचा आणि डोळे पिवळे पडणे.तीव्र अशक्तपणा आणि ताजेतवाने न वाटणे.
Ans: फॅटी लिव्हर, हेपेटायटीस (जळजळ) आणि सिरोसिस होऊ शकते.
Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे, नट्स, लसूण, हळद, ग्रीन टी, कॉफी, ऑलिव्ह ऑइल, मासे (सॅल्मन) आणि आंबवलेले पदार्थ.






