उच्च रक्तदाबाची औषध खाल्ल्यानंतर चक्कर येते? चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर दिसून येतील दुष्परिणाम
उच्च रक्तदाबाची लक्षणे?
रक्तदाबाच्या औषधांचे आरोग्यावर होणारे परिणाम?
उच्च रक्तदाबाची कारणे?
बदलती जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली कोणत्याही वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या धावपळीमध्ये प्रत्येक व्यक्ती व्यायाम करण्याचा खूप जास्त कंटाळा करते. याशिवाय कायमच बाहेरील विकतच्या पदार्थांचे सतत सेवन केले जाते. पण नेहमीच जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे गंभीर आजार होतात. महिलांसह पुरुषसुद्धा शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष देत नाहीत. असे केल्यामुळे छोटे आजार आणखीनच गंभीर स्वरूप घेतात.(फोटो सौजन्य – istock)
Health Care Tips: लहान मुलांमध्ये का वाढतोय थायरॉईडचा धोका? ‘ही’ लक्षणे दिसल्यास वेळीच करा उपचार,
हृदयविकाराचा झटका येण्याच्या काहीदिवस आधी शरीरात असंख्य बदल दिसून येतात. त्यात प्रामुख्याने दिसून येणारा बदल म्हणजे उच्च रक्तदाब. हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. कारण उच्च रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने उच्च रक्तदाबाची लक्षणे आणखीनच तीव्र होतात आणि कोणत्याही क्षणी स्ट्रोक, हृदयविकार किंवा किडनीचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास मेंदूच्या नसा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तातडीने उपचार करावेत.
जगभरात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या आणून खाल्ल्या जातात. पण चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. इतर औषधांप्रमाणेच ब्लड प्रेशरच्या औषधांचा किडनीवर दुष्परिणाम होतो. ACE inhibitors घेणाऱ्या रुग्णांना कोरड्या खोकल्याला सामोरे जावे लागते. याशिवाय सतत खोकून घसा दुखी, झोप मोड होणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यामुळे उच्च रक्तदाब वाढल्यानंतर कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. यामुळे वेळीच आराम मिळेल. ACE inhibitors ऐवजी ARB खाल्ल्यानंतर त्रास होत नाही.
Ans: उच्च रक्तदाबाची अनेकदा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच याला "सायलेंट किलर" म्हणतात. मात्र, चक्कर येणे, डोकेदुखी, धडधडणे, किंवा पाय सुजणे ही लक्षणे दिसू शकतात.
Ans: उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक (Stroke) किंवा मूत्रपिंडाचे (Kidney) आजार होऊ शकतात
Ans: डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटरचा वापर करून, शांत बसून, हाताची स्थिती हृदयाच्या पातळीवर ठेवून दररोज एकाच वेळी मोजणी करावी.






