पनीरसोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन, पोटात वेदना वाढून पचनसंस्थेवर येऊन जास्तीचा ताण
पनीरसोबत कोणते पदार्थ खाऊ नये?
मासे पनीर एकत्र खाल्ल्यास उद्भवणाऱ्या समस्या?
पनीर खाण्याचे फायदे?
घरातील प्रत्येक व्यक्तीला पनीर खायला खूप जास्त आवडते. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि ‘बी12’ जीवनसत्त्व इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी पनीर खाल्ल्यास वजन नियंत्रण राहण्यास, ऊर्जा वाढवणे आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पनीरपासून बनवलेले पदार्थ खावेत. याशिवाय कच्च्या पनीरचे सेवन केल्यास लवकर भूक लागत नाही. शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटी करणासाठी पनीर खावे. शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी पनीर खावे. पण बऱ्याचदा पनीरसोबत खाल्लेले चुकीचे पदार्थ शरीरासाठी घातक ठरतात. आज आम्ही तुम्हाला पनीरसोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
थायरॉईड विकारांचे प्रमाण पुरुष व तरुणांमध्ये का वाढतेय? नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम
पनीरसोबत चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. यामुळे पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव येतो. पनीर पकोडा, पनीर राईस, पनीर टिक्का इत्यादी अनेक पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. पण विरुद्ध पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि वारंवार गॅस, ऍसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. पनीर हा पचनासाठी अतिशय जड पदार्थ आहे. त्यामुळे कोणत्याही पदार्थासोबत पनीर खाल्ल्यास पोटात वेदना होणे, अपचन होण्याची जास्त शक्यता असते.
पनीर हा पदार्थ दुधापासून बनवला जातो. बऱ्याचदा सॅलड किंवा फ्यूजन फूड बनवताना पनीरसोबत संत्री, लिंबू किंवा अननस यांसारखी आंबट फळे सुद्धा वापरली जातात. पण पनीरसोबत आंबट अजिबात सेवन करू नये. हे कॉम्बिनेशन पोटासाठी अतिशय घातक ठरते. पनीर हे दुधापासून बनवले जाते तर आंबट फळांमध्ये सायट्रिक ऍसिड असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे प्रथिनांशी सक्रिय होतात, ज्याच्या परिणामामुळे पोटात वेदना होणे,ऍसिडिटी, गॅस, अपचन इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात.
अनेकांना पनीरसोबत मासे खाण्याची सवय असते. मासे आणि पनीर हे दोन्ही पदार्थ हाय प्रोटीन आहेत. हे पदार्थ पचन होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया मंदावते. अपचनामुळे त्वचेवर पुरळ येणे ॲलर्जी होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पनीरसोबत मासे अजिबात खाऊ नये. यामुळे पोटाचे विकार होतात आणि आरोग्य बिघडून जाते. पनीर पकोडा किंवा पनीरचे पदार्थ खाल्ल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पनीरचे पदार्थ बनवताना त्यात जिरे, मिरी किंवा ओवा इत्यादी मसाल्यांचा वापर करावा.
Ans: पनीरचा तुकडा आगीवर ठेवल्यास जर तो लगेच जळला किंवा धूर आला, तर ते बनावट (भेसळयुक्त) असू शकते. खरे पनीर मऊ असते, तर बनावट पनीर चिवट किंवा कडक असू शकते.
Ans: पनीर जास्त शिजवू नये (overcook). तसेच, तो काही वेळ कोमट पाण्यात ठेवल्यास मऊ राहतो.
Ans: काहीवेळा पनीरमध्ये स्टार्च, मिल्क पावडर, डिटर्जंट किंवा वनस्पती तेलाची भेसळ केली जाऊ शकते.






